Hardik Pandya First Reaction After Out From WC 2023 : विश्वचषक स्पर्धेतील सर्व सात सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. मात्र, या आनंदावर विरजण पडले असून, संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत आपण खूप दुःखी असल्याचे म्हणत भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र आपण पूर्ण उत्साहाने संघासोबत राहणार असल्याचे त्याने म्हटले आहे.
शिंदे सरकारकडून पहिली आश्वासनपूर्ती; कुणबी समितीच्या जीआरची प्रत जरांगेपर्यंत पोहचली
पुण्यात 19 ऑक्टोबर 2023 रोजी बांग्लादेशविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली होती.चेंडू रोखताना त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर तो मैदानात पुन्हा उतरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आता तो येथून पुढे खेळवण्यात येणाऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. हार्दिकच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा (Prasdha Krushna) संघात समावेश करण्यात आला आहे.
World Cup 2023 : अफगाणिस्तान की पाकिस्तान, सेमी फायनलमध्ये कोण? आजच फैसला
हार्दिकची पोस्ट काय?
हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर लिहिले की, विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांमध्ये मी खेळू शकणार नाही हे सत्य पचवणे कठीण आहे. मी पूर्ण उत्साहाने संघासोबत असेन आणि प्रत्येक चेंडूवर त्यांना प्रोत्साहन देईन असे म्हणत त्याने दुखापत झाल्यानंतर खेळाडूंसह सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा, प्रेम आणि सपोर्टसाठी आभार व्यक्त केले आहे. तसेच भारतीय संघ खास असून, सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करेल असा विश्वासही यावेळी हार्दिकने व्यक्त केला.
Tough to digest the fact that I will miss out on the remaining part of the World Cup. I'll be with the team, in spirit, cheering them on every ball of every game. Thanks for all the wishes, the love, and the support has been incredible. This team is special and I'm sure we'll… pic.twitter.com/b05BKW0FgL
— hardik pandya (@hardikpandya7) November 4, 2023
बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघाबाहेर होता. बंगळुरू येथील अॅकॅडमीत त्याच्यावर उपचार सुरू होते. या दुखापतीतून सावरून हार्दिक पांड्या सेमी फायनलच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे असे सांगितले जात होते. मात्र, तसे काही झाले नाही. हार्दिक पांड्याची जागी प्रसिध कृष्णाची संघात निवड करण्यात आली आहे. या बदलाला शनिवारी विश्वचषकाच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने मान्यता दिल्याचे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे.