यंदा ११३ जणांचा चमू ‘Paris’ गाजवणार; कधी, केव्हा अन् कधीपर्यंत?, वाचा भारताचं A टू Z वेळापत्रक

यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ११३ भारतीय खेळाडू टोक्योचा पदकाचा विक्रम मोडतील, अशी आशा आहे. निरज चोप्रा, पी व्ही सिंधू यांच्यासह अनेक दिग्गज आहेत.

यंदा ११३ जणांचा चमू 'Paris' गाजवणार; कधी, केव्हा अन् कधीपर्यंत?, वाचा भारताचं A टू Z वेळापत्रक

यंदा ११३ जणांचा चमू 'Paris' गाजवणार; कधी, केव्हा अन् कधीपर्यंत?, वाचा भारताचं A टू Z वेळापत्रक

Paris Olympic Schedule 2024 : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत २०२०ला भारतीय संघ सर्वात मोठा १२४ खेळाडूंचा चमू घेऊन मैदानात उतरला होता. चार वर्षांपूर्वी भारतीय खेळाडूंनी एकाच ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक ७ पदकं जिंकली होती. (Paris Olympic) २०१२च्या लंडन ऑलिम्पिकनंतर ( ६) ही पदकांची सर्वाधिक आकडेवारी होती आणि यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ११३ भारतीय खेळाडू टोक्योचा पदकाचा विक्रम मोडतील, अशी आशा आहे. (Niraj Chopra) निरज चोप्रा, पी व्ही सिंधू (PV Sindhu) यांच्यासह अनेक खेळाडूंवर भारतीयांची नजर असणार आहे. पण, हे भारतीय कधी, केव्हा आणि कुठं खेळणार आहेत? जाणून घ्या सर्व माहिती.

नोव्हाक जोकोविचचं पुन्हा एकदा स्वप्न भंगल! कार्लोस अल्काराझने पटकावले विम्बल्डनचे विजेतेपद

येत्या २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला सुरुवात होत आहे. पण, २४ जुलैपासून रग्बी व फुटबॉलच्या साखळी फेरीतील सामन्यांना सुरुवात होणारर आहे. भारताचा ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवास २५ जुलैपासून सुरू होईल आणि तिरंदाज मोहीमेची सुरुवात करतील. २७ तारखेला भारत पदकाचं खातं उघडू शकतो. १० मीटर एअर रायफल स्पर्धेत संदीप सिंग, अर्जुन बबूत, एलावेनिल व्हालारिव्ह आणि रमिता हे पदकासाठी प्रयत्न करतील. स्पर्धेचा शेवटचा पदक इव्हेंट हा महिलांच्या ७६ किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेतून होऊ शकतो. यात रितिका हूडा हिला पदकाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.

Exit mobile version