Paris Olympic 2024 साठी ‘या’ भारतीय खेळाडूंची लागली वर्णी; पाहा यादी
Paris Olympic 2024 Selected Indian Players : यावर्षी ऑलम्पिक स्पर्धा ( Olympic 2024 ) होणार आहे. यावर्षीची स्पर्धा ही पॅरिस ( Paris ) ऑलम्पिक असून ती 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 या दरम्यान भरवण्यात येणार आहे. सध्या स्पर्धेची खेळाडूंच्या पात्रतेसाठीच्या फेऱ्या सुरू आहेत. तसेच पॅरिस सह सर्व देशांकडून या स्पर्धकांची जय्यत तयारी सुरू आहे. यामध्ये भारतीय खेळाडू ( Indian Players ) देखील मागे नाहीत. त्यामुळे पात्रता फेऱ्यांमध्ये पॅरिस ओलंपिक 2024 साठी कोणकोणत्या भारतीय खेळाडूंची निवड झाली आहे पाहुयात…
अमित शाह यांच्या आव्हानाला उद्धव ठाकरेंचे सोडतोड उत्तर, म्हणाले, हिम्मत असेल तर…
पॅरिस ओलंपिक 2024 साठी भारतीय खेळाडूंमध्ये आतापर्यंत तब्बल 56 खेळाडू वेगवेगळ्या खेळांसाठी कोटा, रॅंकींग आणि डायरेक्ट क्वालिफाय या स्टेटसनुसार पात्र ठरले आहेत. यामध्ये शूटिंगसाठी भौनिश मेंदिरत्ता, रुद्रांश पाटील, स्वप्नील कुसाले, अखिल श्योरण, मेहुली घोष, स्विफ्ट कौर सामरा, राजेश्वरी कुमारी, सरबजोत सिंह, अर्जुन बाबुता, तिलोत्तमा सेन, मनू भाकर, अनिश भानवाला, श्रीलंका सदांगी, वरून तोमर, इशा सिंह, रिदम सांगवान, विजयवीर सिद्धू, रायजा ढिल्लो, आनंदजीत सिंह नरुका, पलक गुलिया, माहेश्वरी चव्हाण या खेळाडूंचा समावेश आहे.
दरवर्षी नवा पंतप्रधान, देशाचा घंटा-खुर्चीचा खेळ करणार; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
तर ॲथलेटिक्स या खेळासाठी अक्षदीप सिंह, प्रियंका गोस्वामी, विकास सिंह, परमजीत बिष्ट, मुरली श्रीशंकर, अविनाश साबळे, नीरज चोप्रा, पारुल चौधरी, किशोर जेना, सुरज पवार, सर्विंन, अर्शप्रीत सिंह, रामबाबू. बॉक्सिंगसाठी निकहत जरीन, प्रीती पवार, परविन हुड्डा, लवलीना बोरगोहेन हे खेळाडू तर कुस्तीसाठी अंतिम पंघाल, विनेश फोगाट, अंशू मलिक, रितिका यांचा समावेश आहे.
‘तुला लाज नाही लज्जा नाही फक्त बडबडतो’ उद्धव ठाकरेंचा भर सभेत नारायण राणेंवर घणाघात
तर हॉकीसाठी भारतीय टीम, टेबल टेनिससाठी भारतीय पुरुष टीम आणि महिला टीम, तिरंदाजीसाठी धीरज बॉम्म देवरा, सेलिंग साठी विष्णू सरवनन, इक्वेस्ट्रियनसाठी अनुश अग्रवाल, तसेच बॅडमिंटनसाठी पी व्ही सिंधू, एच एस प्रणॉय, लक्ष्यसेन, सात्विक साईराज, रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, अश्विनी पोनप्पा, तनिषा क्रास्टो. या खेळाडूंचा समावेश आहे.