Download App

Paris Olympics 2024: बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागने रचला इतिहास, क्वार्टर फायनलमध्ये धडक

सात्विक साईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या जोडीला पराभूत केले.

  • Written By: Last Updated:

Paris Olympics 2024-Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) भारतासाठी आजचा दिवस जबरदस्त राहिलाय. नेमबाजीत मनू भाकर व व सरबजोत सिंह या नेमबाजाच्या जोडीने भारताला दहा मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदक जिंकून दिले. तर हॉकीमध्ये भारतीय संघाने आर्यलँडला 2-0 ने धूळ चारली. तर बॅडमिंटनमधील साखळी सामन्यात सात्विक साईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) भारतीय जोडीने विजय मिळवत क्वार्टर फायनल गाठली आहे.

Paris Olympics : मनू भाकरने रचला इतिहास! सरबज्योतसह जिंकलं दुसरं कांस्यपदक

या जोडीने इंडोनेशियाचा फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांतो जोडीवर 21-13, 21-13 असा पराभव केला आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय जोडीला मेहनत घ्यावी लागली. सुरुवातीच्या पहिल्या हाफमध्ये इंडोनेशिया 11-8 ने आघाडीवर होती. परंतु भारतीय जोडीने आक्रमक खेळ दाखविला. बॅडमिंटन स्पर्धेतील ग्रुप सीमधील या जोडीने सलग दुसरा विजय मिळविला आहे. त्यामुळे ही जोडी क्वार्टर फायलनमध्ये धडकली आहे. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या क्वार्टर फायनलमध्ये दाखल होणारी ही भारताची पहिली जोडी आहे.

Paris Olympics 2024 मध्ये ‘चक दे! इंडिया’, न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

विजयानंतर चिराग शेट्टी म्हणाले, आम्ही खूप खुष आहेत. कारण आम्ही चांगला खेळ केला आहे. इंडोनेशियन खेळाडूविरुद्ध खेळताना आम्हाला नेहमीच कडवी झुंज द्यावी लागतो. तर स्वात्विकसाईराज रंकीरेड्डी म्हणाला, आम्ही कोणाविरुद्ध खेळतो याचा विचार करत नाही. लढतीसाठी आम्ही स्वतःला तयार करतो. त्यानंतर विरुद्ध कोण आहे, त्यांच्याविरुद्ध खेळतो. तर मनू भाकरने जिंकलेल्या कांस्यपदकावर प्रतिक्रिया देतना चिराग शेट्टी म्हणाला, भारतीय खेळाडूने पदक जिंकणे हे आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. मनूने दोन पदके जिंकणे हे देशासाठी खूप महत्त्वाचे आहे. येत्या काही काळात आमचे खेळाडू पदके जिंकतील, अशी आशा मला आहे.

follow us