Download App

Paris Olympics 2024 : दीपिका कुमारीने केली कमाल, तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) च्या आठव्या दिवशी भारतीय स्टार खेळाडू दीपिका कुमारीने (Deepika Kumari) शानदार

  • Written By: Last Updated:

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) च्या आठव्या दिवशी भारतीय स्टार खेळाडू दीपिका कुमारीने (Deepika Kumari) शानदार कामगिरी करत तिरंदाजी महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. दीपिकाने जर्मनीच्या सातव्या मानांकित मिशेल क्रॉपेनचा पराभव करत तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

या सामन्यात दीपिकाने क्रॉपेनचा 6-4 (27-24, 27-27, 26-25, 29-27 ) असा पराभव केला. तर दुसरीकडे भजन कौरला (Bhajan Kaur) शूटमध्ये पराभव पत्करावा लागला. इंडोनेशियाच्या कोइरुनिसा विरुद्धच्या शूट-ऑफमध्ये भजनला 8-9 असा पराभव पत्करावा लागला.

दीपिकाने सेट 27-24 असा जिंकला होता. तर दुसरा सेट 27-27 असा बरोबरीत राहिला. तर तिसऱ्या सेटमध्ये दीपिकाने 26-25 ने जिंकला आणि चौथा सेट 29-27 असा जिंकून पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या तिरंदाजी महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला.

तर दुसरीकडे ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणारी भजन कौर विरुद्ध कोइरुनिसा हिने पहिला सेट 29-28 असा जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली. तर दुसऱ्या सेटमध्ये कौरने कमबॅक करत 27-25 असा जिंकला.

वाघनखं आणि मुनगंटीवार हे कुठं जुळतंय का? उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

यानंतर हा समान शूटआऊटमध्ये गेला ज्यामध्ये कोइरुनिसाने 9 स्कोर केला तर भजन कौरला 8 पर्यंत पोहोचता आले. या पराभवानंतर भजन कौर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून बाहेर पडली आहे.

follow us