Download App

लोव्हलिना बोर्गोहेन उपांत्यपूर्व फेरीत, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळणार तिसरं पदक?

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या (Paris Olympics 2024) पाचव्या दिवशी भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने (Lovlina Borgohain

  • Written By: Last Updated:

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या (Paris Olympics 2024) पाचव्या दिवशी भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने (Lovlina Borgohain) नॉर्वेजियन बॉक्सर सुनिवा हॉफस्टॅडचा (Suniva Hofstad) पराभव करत महिलांच्या 75 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे भारताला आता आणखी एक पदक मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोव्हलिनाने 5:0 ने नॉर्वेजियन बॉक्सरला पराभव केला आहे.

लोव्हलिना बोर्गोहेनने टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये देखील 69 किलो गटात देशाला कांस्यपदक मिळवून दिले आहे. त्यामुळे या ऑलिम्पिकमध्ये देखील पुन्हा एकदा देशाला पदक मिळवून देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नॉर्वेजियन बॉक्सर सुनिवा हॉफस्टॅड विरुद्ध झालेल्या सामन्यात 27 वर्षीय लोव्हलिना बोर्गोहेनने शानदार कामगिरी करत 5:0 ने हा सामना जिंकला तर आता उपांत्यपूर्व फेरीत लोव्हलिनाचा सामना चीनच्या ली कियानशी होणार आहे.

तर भारतीय बॉक्सर अमित पंघल झांबियाच्या पॅट्रिक चिनयेम्बाविरुद्ध पराभव झाल्याने 51 किलो गटातून बाहेर पडला आहे. याच बरोबर जास्मिन लांबोरिया आणि प्रीतीही पुढच्या फेरीसाठी पात्र ठरले नाही. त्यामुळे आता भारताला लोव्हलिना बोरगोहेनकडून पदकाची आशा आहे.

भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने केला मोठा उलटफेर

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पाचव्या दिवशी भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने (Lakshya Sen) मोठा उलटफेर करत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा (Jonathan Christie) पराभव करत पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये शानदार एन्ट्री केली आहे.

या सामन्यात लक्ष्यने पहिला गेम 21-18 असा जिंकला तर दुसरा गेम 21-12 असा जिंकून प्री-क्वार्टर फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. लक्ष्य ने पहिला गेम 28 मिनिटांत आणि दुसरा गेम 23 मिनिटांत जिंकून जोनाथन क्रिस्टीसह सर्वांना धक्का दिला.

ठाकरेंनी फडणवीसांना चॅलेंज देताच दरेकर, मुनगंटीवारांसह दिग्गज नेते ढाल बनून मैदानात, म्हणाले, रावण कुणाचा…

तर दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनेही (P.V. Sindhu) आपली विजयी मालिका सुरू ठेवली आहे. तिने आपल्या दुसऱ्या सामन्यात आज इस्टोव्हाच्या क्रिस्टिन कुबाचा (Kristin Kuba) सहज पराभव केला आहे. सिंधूने क्रिस्टिनचा 21-5, 21-10 असा पराभव केला.

follow us