Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) पुरुष टेनिस एकेरी कार्लोस अल्काराजचा अंतिम फेरीत पराभव करून सुवर्णपदक जिंकले. जोकोविचने अल्काराजचा 7-6 (7-3), 7-6 (7-2) असा पराभव केला. अल्काराजला टेनिसमधील सर्वात तरुण ऑलिम्पिक चॅम्पियन बनण्याची संधी होती, पण 37 वर्षीय नोवाक जोकोविच अल्कराजला भारी ठरला. 1988 नंतर ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा जोकोव्हिच हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
Novak Djokovic. Olympic champion. 🥇
Congratulations @DjokerNole on completing the career golden slam. 👏#Paris2024 @Paris2024 @ITFTennis pic.twitter.com/ZkM99FSjZv
— The Olympic Games (@Olympics) August 4, 2024
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? 20 तारखेला ‘मविआ’ घेणार मोठा निर्णय
जोकोविच आणि अल्काराज यांच्यात पहिल्या सेटपासूनच रोमांचक लढत पाहायला मिळाली होती. तब्बल 2 तास 50 मिनिटे चाललेल्या या सामन्यात अल्काराजने शेवटपर्यंत चुरशीची लढत दिली. सलामीच्या सेटची सुरुवात अल्काराजसाठी चांगली झाली नाही. त्याने आपली सर्व्हिस राखण्यासाठी ब्रेक पॉइंट वाचवला. तर जोकोविचने तीन ब्रेक पॉइंट जिंकले. पण अल्काराजने 2-2 अशी बरोबरी साधली. पुढच्या गेममध्ये अल्काराजला जोकोविचला ब्रेक करण्याची संधी होती, पण जोकोविचने त्याची सर्व्हिस रोखून धरली.
Wayanad landslide च्या पीडितांसाठी अल्लू अर्जुनची मोठी घोषणा
पहिला सेट तब्बल 94 मिनिटे चालला. दोन्ही सेटमध्ये टायब्रेकर झाला. पण दोन्ही वेळेस अनुभवी जोकोविचने टायब्रेकर जिंकत सुवर्णपदकावर हक्क सांगितला. जोकोविचने पाच ब्रेक पॉइंट वाचवले आणि शेवटी सर्व्हिस राखून स्कोअर 5-4 असा केला. टायब्रेकरमध्येही सामना ३-३ असा बरोबरीत होता, पण जोकोविचने सलग चार गुण मिळवले.
दरम्यान, त्याच्या या विजयासह त्याने सार्बियाच्या खात्यात सुवर्णपदकाची भर घातली. त्याचं हे ऑलिम्पिकमधील पहिलंच सुवर्णपदक आहे. त्याच्या विजयामुळे स्पेनच्या अल्काराजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
यापूर्वी जोकाविचने 16 वर्षांपूर्वी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले होते. 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्याने कांस्यपदक जिंकले होते. तर आता त्याने सुवर्णपदक पटकावले.