Bajrang Punia and Ravi Dahiya: पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) पात्रता फेरीसाठी आयोजित केलेल्या पात्रता फेरीत भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला (Bajrang Punia) पराभव पत्करावा लागला आहे. टोकियो ऑलम्पिक (Tokyo Olympics) (2020) मध्ये बजरंगने कास्य पदक मिळवलं होतं, मात्र त्याला 65 किलो गटाच्या उपांत्य फेरीत पुनियाला रोहित कुमारने पराभूत केले. तर रवी दहिया यालााही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे या दोन्ही खेळाडूंचे स्वप्न भंगले आहे. स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियासाठी हा मोठा धक्का आहे.
बुडत्याचे पाय डोहाकडे, फडणवीसांमुळेचं मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
टोकियो ऑलिम्पिकमध्ये (2020) कांस्यपदक विजेता बजरंगला 65 किलो फ्रीस्टाइल गटाच्या उपांत्य फेरीत रोहित कुमारने पराभूत केले. उपांत्य फेरीत रोहितने पुनियाचा 9-1 असा पराभव केला. त्यामुळं आता फायनलमध्ये रोहित आणि सुजीत यांच्याथ लढत होणार आहे. तर दुसरीकडे रौप्यपदक विजेता रवी दहियालाही टोकियो ऑलिम्पिकमधील पराभवाला सामोरे जावे लागले होते. 57 किलो फ्रीस्टाइल गटात रवीला उदितने १०-८ च्या फरकाने पराभूत केले. त्यामुळे बजरंग आणि रवी दहिया आगामी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. या ट्रायल्सचे आयोजन सोनीपत येथील स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SIA) अकॅडमीमध्ये पार पडले.
निवडणुकी आधी मी शांत बसाव म्हणून ईडीची नोटीस; जप्तीच्या कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक
दरम्यान, गतवर्षी चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंग पुनियाला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. एवढेच नाही तर कांस्यपदकाच्या लढतीत बजरंगला जपानी कुस्तीपटू के. यामागुचनकडून पराभव पत्करावा लागला होता. यामागुचीकडून 10-0 असा पराभव झाला होता. या पराभवनंतर सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. कारण आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी त्याने कोणत्याही स्पर्धात्मक स्पर्धेत भाग घेतला नव्हता. चाचणीशिवाय मोठ्या व्यासपीठावर खेळल्याने त्यांच्यावर टीका झाली.
माजी WFI (रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांमध्ये बजरंग पुनिया एक होता. काही दिवसांपूर्वी बजरंगने युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ला पत्र लिहून WFI विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसांवी UWW ने WFI वरील बंदी उठवली होती.