Paris Olympics Day 15 Schedule : गेल्या 14 दिवसांपासून सुरु असणारा खेळाचा महाकुंभ पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) आता समारोपाकडे जात आहे. उरलेल्या 2 दोन दिवसात भारतीय खेळाडूंकडून संपूर्ण देशाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
उद्या 10 ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीपटू रितिका हुड्डाकडून (Ritika Hooda) भारताला चांगल्या कामगिरीची आशा आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या 15 व्या दिवशी रितिका फ्रीस्टाइल 76 किलो वजनी गटाच्या प्री-क्वार्टर फायनलसह आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. राऊंड ऑफ 16 मध्ये ती हंगेरीच्या (Hungary) बर्नाडेट नागीशी (Bernadette Nagy) भिडणार आहे. जर या सामन्यात तिने विजय मिळवला तर उद्याच तिचा उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. जर उपांत्य फेरीत तिने विजय मिळवला तर ती देशासाठी पदक जिंकू शकते.
अदिती आणि दीक्षाला करणार कमाल
तर दुसरीकडे गोल्फमध्ये अदिती अशोक (Aditi Ashok) आणि दीक्षा डागरकडून (Diksha Dagar) देखील चांगल्या कामगिरीची आशा आहे. सध्या या इन्व्हेन्टमध्ये अदिती आणि दीक्षा मागे आहेत, पण या दोघींचे पुनरागमन अपेक्षित आहे. दिक्षाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये छाप पाडली होती आणि पदक जिंकण्याच्या जवळ आली होती. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत चार कांस्य आणि एका रौप्यपदकांसह पाच पदके जिंकली आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकच्या 15 व्या दिवसाचे भारताचे वेळापत्रक
गोल्फ
महिला : वैयक्तिक अंतिम फेरी (अदिती अशोक आणि दीक्षा डागर) (दुपारी 12.30 वाजता )
मोदी सरकारचा मोठा निर्णय, वक्फ विधेयकाबाबत 31 सदस्यीय JPC जाहीर, ओवीसींसह ‘या’ खासदारांचा समावेश
कुस्ती
महिला : फ्रीस्टाइल 76 किलो प्री-क्वार्टर फायनल (रितिका हुडा विरुद्ध हंगेरी) (दुपारी 2.51 वाजता)
Rahul Gandhi : काँग्रेसला बसणार धक्का, 99 खासदार होणार अपात्र? याचिका दाखल