Download App

शेष भारताचे स्वप्न भंग, 27 वर्षांनंतर मुंबईने जिंकले इराणी चषक

Irani Cup 2024 : रणजी ट्रॉफीनंतर मुंबईने (Mumbai) इराणी कपवर (Irani Cup 2024) आपलं नाव कोरलं आहे. अजिंक्य रहाणेच्या

  • Written By: Last Updated:

Irani Cup 2024 : रणजी ट्रॉफीनंतर मुंबईने (Mumbai) इराणी कपवर (Irani Cup 2024) आपलं नाव कोरलं आहे. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली मुंबईने शानदार कामगिरी करत तब्बल 27 वर्षानंतर इराणी कपवर कब्जा केला आहे. हा सामना अनिर्णित असला तरी मुंबईकडे पहिल्या डावात आघाडी असल्याने मुंबईला या सामन्यात विजयी घोषित करण्यात आले.

या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 537 धावा केल्या होत्या. यानंतर शेष भारताचा डाव 416 धावांत आटोपला. दुसऱ्या डावात मुंबईने आपला डाव 8 गडी गमावून 329 धावांवर घोषित केला. पहिल्या डावात सर्फराज खानने (Sarfaraz Khan) मुंबईसाठी द्विशतक झळकावले, तर दुसऱ्या डावात तनुष कोटियनने शानदार शतक झळकावून मुंबईला विजय मिळवून दिला.

चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शेष भारताचा संघ सामना जिंकेल असे वाटत होते. स्टंपपर्यंत मुंबईची धावसंख्या सहा विकेट गमावून 153 अशी होती. मात्र पाचव्या दिवशी तनुष कोटियनने शानदार खेळी करत शतक झळकावत शेष भारताचे स्वप्न भंगले. तनुषने 150 चेंडूंचा सामना करत 114 धावांची नाबाद खेळी खेळली आणि 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने मुंबईला या सामन्यात विजय करण्यासाठी एक महत्वाची भूमिका बजावली.

तर दुसरीकडे तनुषला मोहितने साथ देत 93 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या. तर दुसरीकडे अभिमन्यू इसवरनची शानदार खेळी सर्फराजने मुबईच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावले. त्याने 222 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीत त्याने 286 चेंडूंचा सामना करत 25 चौकार आणि चार षटकार मारले.

शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांना टिंगल करण्याचा अधिकार पण …, संभाजीराजेंचे पवारांना प्रत्युत्तर

तर शेष भारताकडून अभिमन्यू ईश्वरनने 292 चेंडूत 191 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 16 चौकार आणि एक षटकार लगावला. तर त्याला ध्रुव जुरैलने साथ दिली. जुरैलने 121 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 93 धावा केल्या.

follow us