Download App

Rohit Sharma : हार्दिक नाही, रोहितच कर्णधार! टी 20 विश्वचषकाचा प्लॅन तयार

Rohit Sharma T20 World Cup Captain : आगामी टी 20 विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघाने (T20 World Cup) तयारी सुरू केली आहे. विश्वचषकासाठी अद्याप वेळ आहे मात्र त्याआधीच संघाचा कॅप्टन कोण असेल याचं उत्तर मिळालं आहे. हार्दिक पांड्या  (Hardik Pandya) सध्या मैदानाबाहेर आहे. तर रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठ्या कालावधीनंतर टी 20 मध्ये शानदार कमबॅक केलं आहे. त्यामुळे टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार कोण असा प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी दिलं आहे.

राजकोट स्टेडियमच्या नामकरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. राजकोट स्टेडियमचे नाव आता निरंजय शाह असे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना टी 20 विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल याचं उत्तर शाह यांनी दिलं. शाह म्हणाले, सन 2023 मध्ये आपण विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झालो. पण, त्याआधी सलग दहा सामने जिंकून लोकांची मने जिंकली. मला विश्वास आहे की रोहितच्या नेतृत्वात 2024 चा विश्वचषकात नक्कीच विजयी होऊ.

हिटमॅन रोहित शर्मा सिक्सर किंग बनल्यानंतर ख्रिस गेलनं दाखवली जर्सी; रोहितचं अनोखं उत्तर

रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या होम ग्राऊंडवर टी-20 मालिकेत कर्णधार म्हणून पुनरागमन केले. भारतीय संघाने जानेवारी महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळली होती. दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली होती. रोहितने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 10 नोव्हेंबर 2022 रोजी खेळला होता. त्यानंतर रोहित टी-20 सामना खेळला नव्हता. जवळपास सव्वा वर्षानंतर त्याने टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

रोहित शर्मासह विराट कोहलीही (Virat Kohli) मागील 14 महिन्यांपासून टी-20 क्रिकेट खेळला नव्हता. विराट आणि रोहित यांनी अखेरचा सामना इंग्लंडविरुद्ध 2022 मध्ये टी-20 विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा खेळला होता. त्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव करत स्पर्धेतून बाहेर काढले होते. तेव्हापासून हे दोन्ही खेळाडू एकदिवसीय फॉर्मेटवर लक्ष केंद्रित करत होते, पण आता या वर्षी जूनमध्ये टी-20 विश्वचषक होणार आहे, तेव्हा विराट आणि रोहित टी-20 मध्ये पुनरागमन करू शकतात. आता तर जय शाह यांनी रोहित शर्माच्याच नेतृत्वात भारतीय टी 20 विश्वचषक खेळेल असे स्पष्ट केले आहे.

Virat Kohli : ज्याची भीती होती तेच झालं! विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून आऊट

follow us