Download App

NED vs BAN: नेदरलँड्सचा विश्वचषकात दुसरा उलटफेर, बांग्लादेशचा 87 धावांनी पराभव

World Cup 2023: विश्वचषकाच्या 28 व्या सामन्यात नेदरलँड्सने बांग्लादेशचा 87 धावांनी पराभव केला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर बांग्लादेशला मोठ्या उलटफेरचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने 229 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ 142 धावांवर ऑलआऊट झाला. नेदरलँडसाठी स्कॉट एडवर्ड्सने 68 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर पॉल व्हॅन मीकरेनने 4 विकेट्स घेतल्या आहेत. या विजयासह संघ गुणतालिकेत 8व्या स्थानावर पोहोचला आहे. या विश्वचषकातील त्यांचा हा दुसरा विजय आहे.

बांग्लादेशची सुरुवात खराब झाली आणि नंतर कोणत्याही फलंदाजाला डाव सावरता आला नाही. सलामीवीर लिटन दास अवघ्या 3 धावा करून तंबूत परतला. तनजीद हसन 16 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. मेहदी हसन मिराजने काही धावा जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही 35 धावा करून बाद झाला. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी बांग्लादेशसा सावरण्याची एकही संधी दिली नाही. कर्णधार शकिब अल हसनला वैयक्तिक 5 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

मुशफिकर रहीम 1 धावा करून बाद झाला. मेहदी हसन 17 धावा करून बाद झाला. त्याने 38 चेंडूंचा सामना केला आणि एक चौकार मारला. शेवटी मुस्तफिजुर रहमानने 35 चेंडूत 20 धावा केल्या. तस्किन अहमदने 11 धावा केल्या. अशाप्रकारे 42.2 षटकात 142 धावा करून संपूर्ण संघ ऑलआऊट झाला.

World cup 2023 : ऑस्ट्रेलिया जिंकली पण न्यूझीलंड शेवटच्या चेंडूपर्यंत लढली

एडवर्ड्सची महत्त्वपूर्ण खेळी
नेदरलँडसाठी कर्णधार एडवर्ड्सने महत्त्वाची खेळी केली. त्याने 89 चेंडूंचा सामना करत 68 धावा केल्या. यात 6 चौकार मारले. सलामीवीर विक्रमजीत सिंग 3 धावा करून बाद झाला. त्याचवेळी, मॅक्स ओडोडला खातेही उघडता आले नाही. बरेसीने 41 चेंडूत 41 धावा केल्या. त्याने 8 चौकार मारले. एंगलब्रेक्टने 61 चेंडूत 35 धावा केल्या. व्हॅन बीकने 16 चेंडूत 23 धावा करुन नाबाद राहिला. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. आर्यन दत्त 9 धावा करून बाद झाला. अशा प्रकारे नेदरलँड्सने 50 षटकांत सर्वबाद 229 धावा केल्या.

Gaurav More: मराठी सिनेमाच्या दुरवस्थेबद्दल गौरव मोरेनी व्यक्त केली खंत

बांग्लादेशकडून मुस्तफिजुर रहमानने चांगली गोलंदाजी केली. त्याने 10 षटकात 36 धावा देऊन दोन विकेट घेतल्या. एक मेडन ओव्हर टाकली. मेहदी हसनने 7 षटकांत 40 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. इस्लामने 10 षटकांत 51 धावा देत 2 बळी घेतले. तस्किन अहमदने 9 षटकात 43 धावा देत 2 बळी घेतले.

Tags

follow us