Shardul Thakur perfomance in Ranji Trophy : रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) साखळी सामन्यात जम्मू काश्मीरकडून पराभव स्वीकाराव्या लागलेल्या मुंबईने (Mumbai) उर्वरित सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. मुंबई संघाने हरियाणाचा (Haryana) 153 धावांनी पराभूत करत दिमाखात सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. हरियाणा संघाचा धुव्वा उडविण्यात महत्त्वाची कामगिरी बजाविली ती गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने. त्याने दोन्ही डावात नऊ विकेट्स घेतल्या. तो टीम इंडियाच्या संघातून बाहेर असला तरी रणजीत त्याने चोख भूमिका बजाविली.
ऋषिकेश सावंतचे गायब होणे ते घरी परतने; भाऊ गिरीराजने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
मुंबईने पहिल्या डावात 315 आणि दुसऱ्या डावात 339 धावा बनविल्या होत्या. हरियाणाला विजयासाठी 354 धावांचे टार्गेट होते. प्रत्युत्तरात हरियाणाचा संघ 201 धावांत बाद झाला. शार्दुल ठाकूर याने पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात मुंबईच्या रॉयस्टन डायसने पाच विकेट घेतल्या आहे. पहिल्या डावात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे हा चांगली सुरुवात करूनही मोठी खेळी करू शकला नाही. तो 31 धावांत तंबूत परतला.
तर दुसऱ्या डावात त्याने 108 धावांची खेळी करत शतक झळकविले. तर टी-20 चा कर्णधार सूर्यकुमार यादवने 70 धावांची खेळी केली. तर शिवम दुबेनेही 48 धावा केल्या. मुंबने हरियाणासमोर 354 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु या संघाचा फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांसमोर टिकाव धरू शकले नाही. लक्ष्य दलाल (64) आणि सुमीत कुमार (62) या दोघांनी अर्धशतके झळकविले. परंतु इतर फलंदाजही दुहेरी धावसंख्याही काढू शकले नाहीत. दुसऱ्या डावात डायसने पाच, शार्दुल ठाकूरने तीन आणि तनुष कोटियान याने दोन विकेट्स घेतल्या.
शम्स मुलानी आणि कोटियान यांनी मुंबई संकटातून बाहेर काढले
पहिल्या डावात मुंबई संघासमोर मोठी नामुष्की ओढवली होती. टॉप ऑर्डरमधील चार फलंदाज अवघ्या 25 धावांचे तंबूत परतले होते. परंतु त्यानंतर शम्स मुलानी आणि तनुष कोटियान यांनी जबरदस्त फलंदाजी करत हरियाणाच्या गोलंदाजांना अक्षरश: दमविले. शम्स मुलानी याने 178 चेंडूत 91 धावा केल्या. तर तनुष कोटियानने 173 चेंडूत 97 धावा केल्या. या दोघांच्या जोरावर मुंबईने 315 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात हरियाणा 301 धावांत गारद झाला. या स्पर्धेतील हरियाणाचा हा एकमेव पराभव आहे. त्यानंतर हा संघ स्पर्धेतून बाहेर झालाय. मुंबईबरोबर गुजरातचा संघ फायनलमध्ये दाखल झाला. त्यांनी सौराष्ट्रला क्वार्टर फाइनलमध्ये पराभूत केले आहे.
Mumbai Won by 152 Run(s) (Qualified) #HARvMUM #RanjiTrophy #Elite-QF3 Scorecard:https://t.co/RtjWL3eXKJ
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 11, 2025