Download App

Lakshya Sen : भारताला धक्का, लक्ष्य सेनचा पराभव, कांस्यपदक हुकले

Lakshya Sen : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या 10 व्या दिवशी कांस्यपदकच्या सामन्यात भारतीय स्टार बॅडमिंटनपटू खेळाडू लक्ष्य सेनचा पराभव झाला आहे.

  • Written By: Last Updated:

Lakshya Sen : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या 10 व्या (Paris Olympics 2024) दिवशी कांस्यपदकच्या सामन्यात भारतीय स्टार बॅडमिंटनपटू खेळाडू लक्ष्य सेनचा (Lakshya Sen) पराभव झाला आहे. मलेशियाच्या ली जियाने (Lee Zii Jia) या सामन्यात लक्ष्य सेनचा 13-21, 21-16, 21-11 असा पराभव केला.

या सामन्यात लक्ष्य सेनने दमदार सुरुवात करून पहिला गेम जिंकला होता मात्र त्यानंतर जियाने दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये चांगली कामगिरी करत लक्ष्य सेनचा पराभव केला . यापूर्वी डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनकडून उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा पराभव झाला होता.

या सामन्यात पहिला गेम 13-21 ने सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये देखील लक्ष्य सेन उत्तम कामगिरी केली. मात्र तरीही देखील जियाने आघाडी घेत दुसरा गेम 16-21 ने जिंकला. यानंतर तिसऱ्या गेममध्ये जियाने आक्रमक खेळ खेळत 21-11 ने तिसरा गेम जिंकला.

50 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार?; शेख हसिना भारतात डेरेदाखल

बॅडमिंटनमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली  

ऑलिम्पिक इतिहासात भारतीय संघाला बॅडमिंटनमध्ये तीन पदके मिळाली आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने कांस्यपदक जिंकले होते तर 2016 आणि 2020 मध्ये पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये भारतीय संघासाठी दोन पदके जिंकले आहे. पीव्ही सिंधूने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये आणि 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे.

बांग्लादेशात हिंसाचार अन् पंतप्रधान शेख हसीना यांना सोडावा लागला देश, ‘हे’ आहे कारण

follow us