Download App

शुभमन गिलचा आणखी एक विक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या 2500 धावा

  • Written By: Last Updated:

Shubman Gill Career : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोस येथे खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत आहे. त्याचवेळी भारतीय संघ रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय मैदानात उतरला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जागी संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 धावांचा आकडा गाठला आहे. (Shubman Gill completed 2500 runs in international cricket, this is how this player’s career has been)

शुभमन गिलची आतापर्यंतची कारकीर्द…

शुभमन गिलच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास आतापर्यंत या खेळाडूने 18 कसोटी सामने, 26 वनडे आणि 6 टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. शुभमन गिलने 18 कसोटीत 32.2 च्या सरासरीने आणि 58.97 च्या स्ट्राईक रेटने 966 धावा केल्या आहेत. या खेळाडूने 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये 61.45 च्या सरासरीने आणि 104.89 च्या स्ट्राईक रेटने 1352 धावा केल्या आहेत. शुभमन गिलने कसोटी फॉर्मेटमध्ये 2 वेळा शतकाचा टप्पा ओलांडला आहे. तर शुभमन गिलच्या नावावर वनडे फॉरमॅटमध्ये 4 शतके आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकले आहे. शुभमन गिलने 6 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या 6 सामन्यांमध्ये शुभमन गिलने 165.57 च्या स्ट्राईक रेटने आणि 40.4 च्या सरासरीने 202 धावा केल्या आहेत.

IND vs WI : नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजी घेतला निर्णय, रोहित, विराट संघाबाहेर

शुभमन गिलची आयपीएलमधील कामगिरी…

शुभमन गिलने आयपीएलचे 91 सामने खेळले आहेत. शुभमन गिल आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सकडून खेळला आहे. सध्या तो हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा एक भाग आहे. शुभमन गिलने आयपीएलमध्ये 3 वेळा शतकाचा टप्पा ओलांडला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज