SL Vs NZ 2024 : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी (SL Vs NZ 2024) श्रीलंका क्रिकेट बोर्डने वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा पहिला कसोटी सामना पाच दिवसाचा नसून सहा दिवसाचा होणार आहे. होय, क्रिकेट इतिहासात तब्बल 23 वर्षानंतर एक कसोटी सामना सहा दिवसाचा होणार आहे.
श्रीलंका क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, पहिला कसोटी सामना 18 ते 23 सप्टेंबर दरम्यान गाले येथे खेळवला जाणार आहे. तर 21 सप्टेंबर हा विश्रांतीचा दिवस जाहीर करण्यात आला आहे. या दिवशी श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (Presidential Election) होणार असल्याने श्रीलंका क्रिकेटने हा निर्णय घेतला आहे. तर या मालिकेचा दुसरा कसोटी सामना 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान याच मैदानावर खेळवला जाणार आहे.
2001 मध्ये देखील श्रीलंकेने कोलंबोमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध सहा दिवसांचा कसोटी सामना खेळाला होता. त्यावेळी पौर्णिमेच्या निमित्ताने श्रीलंकेतील पारंपारिक सुट्टी, पोया डेसाठी विश्रांतीचा दिवस ठेवण्यात आला होता. सध्या चालू असलेल्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या चक्राच्या अंतिम सामन्यासाठी श्रीलंका आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ प्रबळ दावेदार आहेत.
सध्या श्रीलंका गुणतालिकेत तिसऱ्या आणि न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहेत. त्यामुळे दोन सामन्यांची ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे. न्यूझीलंड ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी आणि भारताविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर सध्या श्रीलंका इंग्लंडविरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे.
पुण्यात रक्ताचा थरार, दारूवरून वाद अन् हातोड्याने वार, सराईत गुंडाची निर्घृण हत्या
विश्रांतीचा दिवस म्हणजे काय?
कसोटी क्रिकेटमध्ये 19व्या आणि 20व्या शतकात विश्रांतीचा दिवस नियमित भाग होता. या काळात इंग्लंडमध्ये खेळलेले अनेक कसोटी सामने 6 दिवसांचे होते. इंग्लंडमध्ये रविवारी चर्चला जाण्यासाठी रविवारी कसोटी सामन्यांमध्ये विश्रांतीच्या दिवसाची तरदूत करण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस जम्मू काश्मीरसाठी तयार! स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नावांचा समावेश