पुण्यात रक्ताचा थरार, दारूवरून वाद अन् हातोड्याने वार, सराईत गुंडाची निर्घृण हत्या

पुण्यात रक्ताचा थरार, दारूवरून वाद अन् हातोड्याने वार, सराईत गुंडाची निर्घृण हत्या

Pune News: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात हत्या, चोरी (Pune Crime News) या सारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. माहितीनुसार, 22 ऑगस्टच्या रात्री पुण्यातील सिंहगड रस्त्यावर (Sinhagad Road) एका सराईत गुंडाची हत्या करण्यात आली आहे.

सिंहगड रस्त्यावरील एका बारमध्ये झालेल्या वादामुळे 22 ऑगस्टच्या मध्यरात्री बाराच्या सुमारास हनुमंत उर्फ गोट्या शेजवळ (Hanumant) या सराईत गुंडाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या प्रकरणात सिंहगड रोड पोलीसांनी आरोपी गणेश आकाश कुलकर्णी (Ganesh Akash Kulkarni) याला अटक देखील केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रिज जवळ क्लासिक बार हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री गोट्या शेजवळ दारू पिण्यासाठी बसला होता आणि याच हॉटेलमध्ये आरोपी आकाश कुलकर्णी देखील दारू पीत होता मात्र अचानक दोघांमध्ये वादावादी झाली आणि आरोपी आकाश कुलकर्णी हॉटेलमधून बाहेर पडला. यानंतर आरोपी आकाश कुलकर्णी याचा गोट्या शेजवळने पाठलाग सुरु केला आणि आरोपीला त्रास देऊ लागला.

त्यानंतर आरोपी आणि गोट्या शेजवळ सिंहगड रस्ता परिसरातीलच सुवर्ण हॉटेल जवळ पोहोचले. तिथे देखील त्यांच्यात वाद झाला आणि पुन्हा गोट्या शेजवळ आरोपीला त्रास देऊ लागला. त्यानंतर संतापलेल्या आकाश कुलकर्णी याने रस्त्यावरच असणाऱ्या एका पंक्चरच्या दुकानातील हातोडा घेतला आणि गोट्या शेजवळच्या डोक्यात घातला.

राष्ट्रवादी काँग्रेस जम्मू काश्मीरसाठी तयार! स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नावांचा समावेश

वर्मी घाव बसल्याने गोट्या शेजवळ रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सिंहगड रोड पोलीसांनी आरोपी गणेश आकाश कुलकर्णी याला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

कोणता CM बेस्ट, कुणाचं घटलं वजन? CM शिंदेंचा नंबर कितवा.. सर्व्हेतून धक्कादायक माहिती

follow us
  • fb
  • instagram
  • youtube