Download App

‘रोहित-कोहली अजून देखील…’, सौरव गांगुलीने T20 संघ निवडीवर केला प्रश्न उपस्थित

  • Written By: Last Updated:

भारताला पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या टी-20 मालिकेसाठी बुधवारी (5 जुलै) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. 15 सदस्यीय संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असेल. त्याचबरोबर स्टार फलंदाज विराट कोहली आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा संघाचा भाग नाहीत. (sourav-ganguly-statement-on-team-india-squad-for-west-indies-t20-series-virat-kohli-rohit-sharma)

आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने टी-20 संघाच्या निवडीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 51 वर्षांचा असलेल्या गांगुलीने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टी-20 संघातील अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गांगुलीच्या मते, हे दोन्ही दिग्गज खेळाडू अजूनही टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी योगदान देऊ शकतात.

एका स्पोर्ट्स प्लॅटफॉर्मशी संवाद साधताना गांगुली म्हणाला, ‘निश्चितपणे एखाद्याने आपले सर्वोत्तम खेळाडू निवडले पाहिजेत, ते कोण आहेत याने काही फरक पडत नाही. माझ्या मते विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचेही टी-20 क्रिकेटमध्ये स्थान आहे. कोहली किंवा रोहित टी-20 आंतरराष्ट्रीय का खेळू शकत नाहीत हे मला समजत नाही. आयपीएलदरम्यान कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. तुम्ही मला विचाराल तर दोघांचेही टी-20 क्रिकेटमध्ये स्थान आहे.

BCCI Policy : परदेशी लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयचा दणका; आणणार नवी पॉलिसी

रोहित आणि कोहली व्यतिरिक्त, आयपीएल स्टार रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड आणि जितेश शर्मा देखील टी -20 संघात स्थान मिळवू शकले नाहीत. याबाबत गांगुली म्हणाला की, युवा खेळाडूंनी कामगिरी करत राहावे, त्यांची वेळ नक्कीच येईल. माजी कर्णधार म्हणाला, ‘त्याला फक्त खेळत राहायचे आहे आणि कामगिरी करत राहायचे आहे. संघात फक्त 15 निवडले जाऊ शकतात आणि 11 खेळू शकतात. त्यामुळे कुणाला तरी चुकवावी लागते. त्याची वेळ येईल याची मला खात्री आहे.

नवे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीची ही पहिलीच बैठक होती. आगरकर यांची याच महिन्यात टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पाहिलं तर आगरकरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी युवा खेळाडूंवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. या T20 संघात 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे दोनच खेळाडू आहेत, ज्यात जगातील नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादव आणि लेगस्पिनर युजवेंद्र चहल यांच्या नावाचा समावेश आहे.

भारताचा टी२० संघ: इशान किशन (विकेटकीप), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई , अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.

Tags

follow us