Download App

Stuart Broad Retirement : स्टुअर्ट ब्रॉडचा धक्कादायक निर्णय; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Stuart Broad Retirement : क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड संघाचा धडाकेबाज गोलंदाज स्टु्अर्ट ब्रॉड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यातील तिसऱ्या दिवशी ब्रॉडने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. ब्रॉडची क्रिकेट कारकीर्द 17 वर्षांची राहिली. या काळात त्याने अनेकदा संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर संघाने अनेक सामने एकहाती फिरवले.

सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज

ब्रॉडने 167 कसोटी सामन्यात संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्याने आतापर्यंत 602 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो जगातील पाचवा गोलंदाज आहे. याआधी मुथैय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, जेम्स अँडरसन आणि अनिल कुंबळे या चौघा गोलंदाजांचा नंबर आहे. या गोलंदाजांना ब्रॉडपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.

युवराजचे सहा षटकार ठरला टर्निंग पॉइंट

2006 मध्ये ब्रॉडने क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2007 च्या टी 20 विश्वचषकात युवराज सिंह याने ब्रॉडच्या एकाच ओव्हरमधील सहाच्या सहा बॉलवर षटकार ठोकत नवा रेकॉर्ड केले होते. क्रिकेटच्या इतिहासातील हा अविस्मरणीय क्षण होता. यानंतरच स्टुअर्ट ब्रॉडची चर्चा झाली होती. त्यानंतर ब्रॉडने गोलंदाजीत कमालीची सुधारणा केली. त्यानंतर दर्जेदार गोलंदाजाच्या यादीत त्याचे नाव घेतले जाऊ लागले. टेस्ट क्रिकेटमध्ये जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड ही जोड प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत होती.

Asia Champion कुस्ती स्पर्धेत जामखेड गाजलं; सुजय तनपुरेला सुवर्णपदक

तीन वेळी अख्खा संघ ऑलआऊट

ब्रॉडने 20 वेळेस 5 गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. तर 3 वेळेस 10 गडी बाद करण्याचा कारनामाही त्याच्या नावावर आहे. फलंदाजीत त्याने 243 डावात 3 हजार 656 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 1 शतक आणि 13 अर्धशतके केली आहेत. म्हणजेच तो संघाच्या गोलंदाजीचा मुख्य आधार होताच शिवाय गरज असेल त्यावेळी फलंदाजी करत संघाला अडचणीतून बाहेर काढत होता.

मी एक दिवस आधीच निर्णय घेतला होता – ब्रॉड

ब्रॉड म्हणाला, निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ होती. यावर मी एक दिवस आधीच निर्णय घेतला होता. संघाचा कर्णधार स्टोक्सलाही या निर्णयाची माहिती दिली होती. अॅशेस मालिकेतच आपला अखेरचा सामना खेळावा अशी माझी कायमच इच्छा होती. त्यामुळे ही मालिका सुरू असतानाच निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याचे ब्रॉड म्हणाला.

Tags

follow us