Download App

पाच प्लॅन यशस्वी ठरले तर विश्वचषक टीम इंडियाचाच; विजयाचं गणितही होणार सोपं

सन 2007 मध्ये पाहिला टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघ फक्त एकदाच 2014 मध्ये अंतिम सामन्यात जाऊ शकला.

T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यास थोडेच दिवस शिल्लक (T20 World Cup 2024) राहिले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात जेव्हा टीम इंडिया अमेरिकेत जाईल तेव्हा प्रत्येकाच्या नजरा विश्वचषक दुसऱ्यांदा जिंकण्याकडे असतील. टी 20 प्रीमियर लीग स्पर्धा सुरू झाल्यापासून भारत टी 20 विश्वचषक जिंकण्यात अपयशी राहिला आहे. सन 2007 मध्ये पाहिला टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघ फक्त एकदाच 2014 मध्ये अंतिम सामन्यात जाऊ शकला. या सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव केला. पण आज आपण अशा पाच गोष्टींची माहिती घेणार आहोत ज्या अस्तित्वात आल्या तर भारत पुन्हा विश्वविजेता बनू शकतो.

भारतीय क्रिकेट टीमला जर यंदाचा विश्वचषक जिंकायचा असेल तर संपूर्ण स्पर्धेत आक्रमक खेळ करावा लागेल. डावाची सुरुवात करताना वेगाने धावा कराव्या लागतील ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघ दडपणात येईल. पॉवर प्ले मध्ये संघाला जास्तीत जास्त रन बनवावे लागतील. अशी दमदार सुरुवात झाली तर स्पर्धेत टीम इंडिया चांगले टार्गेट सेट करू शकेल.

T20 World Cup : आयसीसीने केली सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ‘या’ संघाला देणार टक्कर

ज्या पद्धतीने संघाला आक्रमक सुरुवात करत जास्तीत जास्त रन बनवावे लागतील त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना सुरुवातीच्या ओवर्समध्ये विकेट्स घ्याव्या लागतील. जेणेकरून प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना खेळ पट्टीवर स्थिरावता येणार नाही.

टीम इंडियाचा स्टार आणि धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव या स्पर्धेत महत्वाची भूमिका बजावू शकतो. टी20 क्रिकेटमध्ये सूर्या नेहमीच जबरदस्त फलंदाजी करतो. तसेच वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर क्रिकेटमध्ये वापसी करणारा फलंदाज ऋषभ पंत सुद्धा कमाल दाखवू शकतो. मधल्या फळीतील राईट लेफ्ट कॉम्बिनेशन संघासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

विराट कोहली जर रोहित शर्माबरोबर डावाची सुरुवात करण्यासाठी आला तर मधल्या फळीत आणखी एका फलंदाजाला संधी मिळू शकते. यासाठी शिवम दुबेचा विचार होऊ शकतो. दुबे मध्यम गतीने गोलंदाजी सुद्धा करू शकतो. यामुळे हार्दिक पांड्यावरील गोलंदाजीचा भार कमी होऊ शकतो.

T20 विश्वचषकात टीम इंडिया ‘या’ दोन संघांविरुद्ध जिंकलीच नाही; यंदाही आव्हान कायम

गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे असेल. यामध्ये रवींद्र जडेजा, अक्षर पटेलसह चार गोलंदाजांना संधी मिळणार आहे. युजवेंद्र चहाल आणि कुलदीप यादव हे आणखी दोन फिरकी गोलंदाज आहेत. या सर्व गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.

follow us