Download App

वर्ल्डकपचं वेळापत्रक पुन्हा बदलणार? पाकिस्तानचाच सामना ठरतोय कारण

ODI World Cup 2023 : यंदा विश्वचषक स्पर्धा (ODI World Cup 2023) भारतात होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. पण सुरक्षेच्या कारणांमुळे या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले होते. आताही पुन्हा या वेळापत्रकात पुन्हा बदल होतील की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

आधी ज्यावेळी वेळापत्रकात बदल केला होता त्यावेळी भारत-पाकिस्तानसह नऊ सामन्यांचेव वेळापत्रक बदलण्यात आले होते. आता पुन्हा एकदा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने विश्वचषकाच्या वेळापत्रकावर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे बीसीसीआय (BCCI) टेन्शनमध्ये आहे. एचसीएने पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कदाचित पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात बदल होण्याची शक्यता आहे.

World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाचा ‘शुभंकर’ लॉन्च

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने वर्ल्डकपच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या सामन्याात बदल होऊ शकतो. विश्वचषकातील सामने आयोजित करणे कठीण होऊ शकते,असे असोसिएशनने बीसीसीआयला कळवले आहे. 9 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर न्यूझीलँड आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच मैदानावर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

या दोन्ही सामन्यात जास्त अंतर नाही. त्यामुळे हैदराबाद पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांच्या दृष्टीने पाकिस्तान आणि श्रीलंका हा सामना जास्त आव्हानात्मक आहे. हा सामना आधी 12 ऑक्टोबर रोजी होणार होता. पण, 14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला आहे. त्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला होता. यानंतर आता बीसीसीआय आणि आयसीसी काय निर्णय घेणार, विश्वचषकाच्या वेळापत्रकात खरेच बदल केला जाणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Archers World Cup : भारतीय तिरंदाजांचा अचूक लक्ष्यभेद; ‘रिकर्व्ह’ प्रकारात ब्राँझपदकांची कमाई

Tags

follow us