Download App

IND vs WI : विंडीजचा पराक्रम! दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

IND vs WI : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीज संघाने टीम इंडियाचा पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाची स्थिती अतिशय वाईट झाली होती. फक्त 181 धावांवरच संध गारद झाला होता. त्यानंतर वेस्टइंडिज संघाने चार सहा विकेट राखत सामना खिशात टाकला. या विजयानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे.

वेस्टइंडिजकडून शे होपने दमदार खेळ केला. केसी कार्टीच्या साथीने दोघांनी पाचव्याव विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. होपने 80 तर कार्टेने 48 धावा केल्या. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्टइंडिज संघाची सुरुवातही चांगली झाली. सलामीवीर किंग आणि कायल मेयर्स यांनी 53 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शार्दुल ठाकूरने चांगली गोलंदाजी करत दोन फलंदाजांना एका पाठोपाठ बाद केले. ब्रँडन किंग आणि कायल मेयर्स एकाच ओव्हरमध्ये बाद झाले.

शुभमन गिलचा आणखी एक विक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या 2500 धावा

त्यानंतर शिमरॉन हेटमायर यांनी कर्णधार होपला साथ केली. या दोघांनी संघाला शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. यानंतर हेटमायर कुलदीप यादवच्या फिरकीवर बाद झाला. त्यनंतर आलेल्या केसी कार्टेने मात्र चांगली साथ दिली. होप आणि कार्टे या दोघांनी 91 धावांची भागीदारी केली. त्यांच्या खेळीने विंडीज संघाला विजय मिळवून दिला.

अन् चांगली संधी हुकली

या सामन्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती मिळाली होती. तर हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत होता. ब्रिजटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 5 गडी राखून विजय मिळवला. त्या सामन्यात जडेजा-कुलदीपच्या घातक गोलंदाजीसमोर कॅरेबियन फलंदाज हतबल दिसले आणि संपूर्ण संघ 114 धावांत गारद झाला. त्यानंतर कालची दुसरी वनडे जिंकून भारतीय संघाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र भारतीय संघ यात अपयशी ठरला.

Tags

follow us

वेब स्टोरीज