Neeraj Chopra Clarification On Arshad Nadeem : ऑलिम्पिक पदक विजेता अरशद नदीमने (Arshad Nadeem) भारतीय गोल्डन बॉय नीरज चोपडाचे निमंत्रण नाकारले. 24 मे रोजी बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या नीरज चोपडा क्लासिक जेवलिन इव्हेंटमध्ये नदीम भाग घेणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव (India Pakistan Tension) पाहता नदीमने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, त्याने यामागे वेगळंच कारण दिलं आहे. आगामी एशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपसाठी प्रशिक्षणाचे कारण नदीमने पुढे केले आहे. यानंतर नीरज चोप्राने सोशल मिडियावर एक पोस्ट लिहीली आहे. सोशल मीडियावर लोकांकडून टीका सहन करावी लागल्याचे नीरजने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नदीम सध्या लाहोरमध्ये स्पर्धेची तयारी करत आहे. पॅरिस ऑलिम्पिक्स (Paris Olympics) स्पर्धेदरम्यान नदीमने 92.97 मीटर थ्रो करत सुवर्णपदक पटकावले होते. तर नीरजने दुसरा क्रमांक मिळवला होता.
नीरजने नदीमला भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते. परंतु, पहलगाम येथे झालेला हल्ला पाहता यात पाकिस्तानचाच हात असल्याचे समोर आले आहे. या घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याने देशभरात संताप धुमसत आहे. अशा परिस्थितीत नीरजने एका पाकिस्तानी खेळाडूला भारतात येण्याचे आमंत्रण दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याबाबतीत नीरज म्हणाला की अरशदला मी दिलेलं निमंत्रण एका अॅथलीटकडून दुसऱ्या अॅथलीटला दिलं गेलेलं निमंत्रण होतं. माझ्या दृष्टीने देशाचं हित सर्वोच्च आहे. मी शक्यतो जास्त बोलत नाही पण याचा अर्थ असा नाही की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या विरुद्धही बोलणार नाही. ज्यावेळी माझं देशप्रेम आणि माझ्या परिवाराच्या सन्मानाची गोष्ट असेल त्यावेळी मी नक्कीच बोलणार.
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) April 25, 2025
माझ्यासाठी देशाचे हित सर्वोच्च राहील. दहशतवादी हल्ल्यात ज्या लोकांनी त्यांचे स्वजन गमावले त्यांच्या प्रती माझ्या संवेदना आहेत. मला विश्वास आहे की आपल्या देशाची प्रतिक्रिया एक राष्ट्राच्या रुपात आपली ताकद दाखवील. मी अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधीत्व करतोय. माझ्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत या गोष्टीचं मला वाईट वाटतं. मला आणखी एका गोष्टीचं वाईट वाटत आहे की काहीही कारण नसताना मला आणि माझ्या कुटुंबाला टार्गेट करणाऱ्या लोकांना मला उत्तर द्यावं लागत आहे.
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानला धडकी; इलाका तुम्हारा धमाका हमारा, भारताकडून मोठे संकेत