Download App

टीम इंडियाच्या हेड कोचसाठी माझ्याकडे वेळ नाही; ऑफरआधीच माजी खेळाडूचा नकार

श्रीलंका टीमचा माजी फलंदाज कुमार संगकाराने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक होण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

Kumar Sangakkara Indian Team head coach : टी 20 विश्वचषकानंतर भारतीय संघाला नवा कोच मिळणार आहे. सध्या राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाची शोध मोहिम सुरू केली आहे. या पदासाठी अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे. परंतु, आतापर्यंत अनेक माजी खेळाडूंनी या पदासाठी स्वतःहून नकार दिला आहे. यामध्ये आणखी एका माजी खेळाडूची भर पडली आहे. श्रीलंका टीमचा माजी फलंदाज कुमार संगकाराने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक होण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. संगकारा म्हणाला की यासाठी माझ्याकडे वेळ नाही.

T20 विश्वचषकात टीम इंडिया ‘या’ दोन संघांविरुद्ध जिंकलीच नाही; यंदाही आव्हान कायम

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. यासाठी 27 मे पर्यंत मुदत आहे. रिकी पाँटिंग आणि जस्टीन लँगर यांना संपर्क केल्याच्या चर्चा होत्या. या चर्चात काही तथ्य नाही असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. यानंतर झिम्बाब्वे संघाचा माजी फलंदाज अँडी फ्लावरने या पदासाठी अर्ज करण्यास नकार दिला होता.

यानंतर चेन्नईतील टी 20 प्रीमियर लीग सामन्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी कुमार संगकारला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत प्रश्न विचारला. त्यावर संगकारा म्हणाले, या पदासाठी अजून मला कुणीही संपर्क केलेला नाही. भारतीय संघासाठी वेळ देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे कुमार संगकारा भारतीय संघाचा हेड कोच होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

श्रीलंका क्रिकेटला मोठा दिलासा ! आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यावरील बंदी आयसीसीने उठवली

दरम्यान,  बीसीसीआयने (BCCI) वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. T20 World Cup 2024 साठी बीसीसीआयने 15 खेळाडूंची निवड केली. या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार आहे तर उपकर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) निवड करण्यात आली. रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, सिराज, जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

follow us

वेब स्टोरीज