Download App

आयसीसीचा मोठा निर्णय! आता टी 20 वर्ल्डकपमध्ये दिसणार 16 क्रिकेट टीम

सन 2030 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत 16 महिला क्रिकेट संघ सहभागी होतील असा निर्णय आयसीसीने घेतला.

ICC on Women’s T20 World Cup : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये (ICC Women’s T20 World Cup) समानता आणण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आयसीसीची वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली तसेच काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये महिला टी 20 विश्वचषकाबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार 2030 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत 16 महिला क्रिकेट संघ सहभागी होतील. पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये समानता राखण्याच्या वचनबद्धतेचे पालन केले जाईल असे संकेत या बैठकीत देण्यात आले.

एकीकडं आनंद तर दुसरीकडं दु:ख; ऐतिहासीक विजयानंतर रोहित-विराटची टी 20 मधून निवृत्ती

महिला टी 20 वर्ल्डकप इतिहास पाहिला तर सन 2009 मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती. त्यावेळी आठ संघ सहभागी झाले होते. यानंतर 2016 मध्ये सहभागी संघांची संख्या दहा झाली होती. त्यानंतर 2026 मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये बारा संघ सहभागी होतील. 2030 मध्ये सहभागी संघांची संख्या 16 राहिल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आगामी टी 20 वर्ल्डकपमध्ये पात्र होण्यासाठीची अंतिम मुदतही निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, 2026 मध्ये श्रीलंका आणि भारतात  पुरुष टी 20 वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धेत वीस क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. त्यानुसार या स्पर्धेची तयारी करण्यात येणार आहे. नुकत्याच श्रीलंका आणि वेस्टइंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टी 20 विश्वचषकात वीस संघ सहभागी झाले होते. इतक्या मोठ्या संख्येने संघ सहभागी होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ होती. तरी देखील कोणत्याही अडचणी न येता स्पर्धा पार पडली.

यानंतर आगामी विश्वचषकातही वीस संघ सहभागी करून घेण्यास आयसीसीने ग्रीन सिग्नल दिला आहे. या स्पर्धेसाठी आताच बारा संघ पात्र ठरले आहेत. आठ संघांना मात्र क्वालिफायर्स प्रत्येकी दोन संघ, अमेरिका क्वालिफायर्समधून एक संघ आणि आशिया आणि इस्ट आशिया पॅसिफिक यांच्या एकत्र क्वालिफायरमधून तीन संघ आगामी टी 20 वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील. सद्यस्थितीत भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडिज, इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड, आयर्लंड, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान संघ पात्र ठरले आहेत.

झिम्बाब्वेचा पराभव पण धक्का पाकिस्तानला; टीम इंडियाने बनवलं खास रेकॉर्ड

follow us