भारत पाकिस्तान सामन्याची क्रेझ; एका तिकीटाची किंमत ऐकून बसेल धक्का

टी 20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकिटाची किंमत तब्बल 2 लाख 29 हजार 625 रुपये इतकी आहे.

Champions Trophy

Champions Trophy

T20 World Cup 2024 : यंदाचा टी 20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडीज (T20 World Cup 2024) या दोन देशात होणार आहे. स्पर्धा सुरू होण्यास थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातही सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना (IND vs PAK) असेल तर क्रिकेट चाहत्यांची मोठी गर्दी होते. तिकिटाचे दर कितीही असले तरी स्टेडियम भरतेच. यंदाही असाच अनुभव येत आहे. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक किंमत भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण या सामन्याच्या तिकिटाची किंमत तब्बल 2 लाख 29 हजार 625 रुपये इतकी आहे. सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत 25 हजार रुपये आहे. या सामन्याची 90 टक्के तिकिटे विकली गेली आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपल्या (ICC) अधिकृत वेबसाइटवर तिकिटांच्या किमतीची माहिती दिली आहे. यात सर्वाधिक किंमत भारताच्या सामन्यांची आहे. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. या स्टेडियमची आसन क्षमता 34 हजार आहे. या सामन्याची बहुतांश तिकिटे विकली गेली आहेत. या सामन्याच्या जनरल स्टँड मधील तिकिटाची किंमत 300 डॉलर आहे. तर क्लब कॉर्नरच्या तिकिटाची किंमत तब्बल 2 हजार 750 डॉलर इतकी आहे.

T20 World Cup : आयसीसीने केली सराव सामन्यांची घोषणा; टीम इंडिया ‘या’ संघाला देणार टक्कर

भारतीय संघाच्या कोणत्याही सामन्याच्या तिकिटाची किंमत 7 हजार 515 डॉलर पेक्षा कमी नाही. तर ओमान आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्याच्या तिकिटाची किंमत सर्वात स्वस्त म्हणजे सहा डॉलर आहे. विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पाहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड विरोधात होणार आहे. टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाने आतापर्यंत 44 सामने खेळले असून 28 सामन्यांत विजय मिळवला आहे. सन 2007 मध्ये पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरल होतं.

सराव सामन्यांची घोषणा

या स्पर्धेत एकूण १६ सराव सामने होतील. १७ संघ सराव सामने खेळणार आहेत. हे सामने अमेरिकेतील टेक्सास, फ्लोरिडा, वेस्टइंडिजमधील त्रिनिदाद अँड टोबॅगो या ठिकाणी होणार आहेत. या सामन्यांना अधिकृत टी २० सामन्यांचा दर्जा नाही. या सामन्यात १५ खेळाडूंना खेळण्याची परवानगी आहे. या सामन्यासाठी तिकीट विक्री सुरू झाली आहे. टीम इंडियाचा पहिला सराव सामना बांग्लादेश विरुद्ध १ जून रोजी होणार आहे.

Exit mobile version