Wanindu Hasaranga : श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अवघ्या 26 वर्षीच हसरंगा याने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SriLanka Cricket Board) ने त्याला मंजुरी दिली आहे. केवळ वन-डे व ट्वी-20 सामने खेळण्यासाठी हसरंगा याने हा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळतो.
‘Fighter’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित; दीपिका, हृतिक अन् अनिक कपूर यांच्या लूकनं वेधलं लक्ष
हसरंगाच्या निवृत्तीबाबत श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सीईओ एशले डी सिल्वा म्हणाले, कसोटी क्रिकेटमधून निवृ्त्ती घेण्याबाबत त्याने बोर्डाला कळविले होते. त्याचा निर्णयाला बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे तो वन-डे, ट्वी-20 क्रिकेटमध्ये तो चांगली कामगिरी करेल. तो संघाचा महत्त्वाचा खेळाडू असेल. हसरंगा हा आपल्या संघासाठी केवळ चार सामने खेळला आहे. त्यात त्याने चार गडी बाद केलेले आहेत. तर एक अर्धशतक झळकविलेले आहे.
Akshay Kumar Indian Citizenship: खिलाडीला मिळाले भारताचे नागरिकत्व; पोस्ट शेअर करत म्हणाला…
Sri Lanka Men’s all-rounder Wanindu Hasaranga has informed Sri Lanka Cricket that he will retire from playing test cricket. –
READ: https://t.co/cPV4jbzHeZ #SLC— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 15, 2023
हसरंगाची कारकीर्द
हसरंगा 2017 मध्ये श्रीलंका संघात दाखल झाला आहे. आतापर्यंत तो 48 वन-डे आणि 58 टी-20 सामने खेळला आहे. वन-डेमध्ये त्याने 67 विकेट्स घेतल्यात. तर 832 धावा केल्या आहेत. त्याच चार अर्धशतके आहेत. त्याने टी-20 मध्ये 91 विकेटस् घेतल्या आहे. तर 533 धावा केल्या असून, एक अर्धशतक झळकविले.