Ind vs Aus 3rd Test : पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतीय कर्णधार रोहित शर्मा खेळला नाही. त्यानंतर त्याच्या जागी केएल राहुलने सलामीची जबाबदारी स्वीकारली. (Rohit Sharma) दुसऱ्या कसोटीत राहुलने सलामी दिली आणि रोहित मधल्या फळीत खेळायला आला. मात्र, त्याला दमदार कामगिरी करता आली नाही. त्याने तीन आणि सहा धावांची खेळी खेळली. दरम्यान, सुनील गावसकर आणि रवी शास्त्री यांनी रोहितला सलामीचा सल्ला दिला आहे.
रोहित, कोहली अन् पंत फ्लॉप, स्टार्कने दिला भारताला धक्का, टीम इंडिया 180 धावांवर ऑलआऊट
आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून गाबा मैदानावर खेळवला जाणार आहे. माजी भारतीय कर्णधार गावसकर यांनी केएल राहुल संधीचा फायदा घेण्यास अयशस्वी ठरल्याचं सांगितलं. गावसकर म्हणाले, राहुलने डावाची सुरुवात का केली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रोहित पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नसल्याने त्याने हे केले. त्याने जैस्वालसोबत 200 धावांची भागीदारी केली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याला सलामीवीर म्हणून कायम ठेवण्यात आले ते मी समजू शकतो, पण आता या कसोटीत त्याला धावा करता आल्या नाहीत, तेव्हा राहुलने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर परत जावे आणि रोहितने डावाची सुरुवात करावी, असं मला वाटतं असं ते म्हणालेत.
रवी शास्त्री यांनी मोठी सांगितली गोष्ट
रवी शास्त्री म्हणाले की, ‘रोहित शर्मा सलामीलाच आक्रमक खेळू शकतो. मधल्या फळीत तो जरा शांत दिसत होता हे त्याच्या देहबोलीतून जाणवले. मी त्याला सामन्यादरम्यान उत्साही पाहू इच्छित होतो. पुढील तिन्ही कसोटी सामन्यांदरम्यान रोहितने पुढे येऊन नेतृत्व केल्यास ऑस्ट्रेलियाला तोडीस तोड उत्तर देता येणार आहे.
दुसऱ्या कसोटीत राहुल ठरला अपयशी
ॲडलेड कसोटीच्या आधी रोहित म्हणाला की, मालिकेच्या पहिल्या सामन्यात संघाला यश मिळवून देणाऱ्या कॉम्बिनेशनमध्ये छेडछाड करायची नाही. पर्थमधील पहिली कसोटी भारताने 295 धावांनी जिंकली होती. कॅनबेरा येथे झालेल्या सराव सामन्यातही त्याने मधल्या फळीत फलंदाजी केली. राहुलने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात सहकारी सलामीवीर आणि शतकवीर यशस्वी जैस्वालसोबत 201 धावांची भागीदारी केली. त्याने कसोटीत 26 आणि 77 धावा केल्या. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याला त्याचा फॉर्म दाखवण्यात अपयश आले.