Download App

मोदींची भेट, मुंबईत ओपन बसमधून सेलिब्रेशन; विश्वविजेत्या टीम इंडियाचं भारतातलं प्लॅनिंग ठरलं!

Team India नेटी 20 विश्वचषक जिंकला मात्र चक्रीवादळाने भारतीय खेळाडू बार्बाडोसमध्येच अडकले. मात्र आता ते उद्या (4 जून) सकाळी मायदेशी परततील

T-20 World Cup winner Team India will meet PM Modi : भारतीय क्रिकेट संघाने (Team India) टी 20 विश्वचषक जिंकला (T-20 World Cup winner). यानंतर बेरिल नावाच्या चक्रीवादळाने भारतीय संघाच्या प्रवासात आडकाठी आणली. खेळाडू बार्बाडोसमध्येच (Barbados) अडकून पडले. मात्र आता खेळाडू उद्या (4 जून) सकाळी मायदेशी परतणार आहेत. परतल्यानंतर विश्वविजेत्या टीम इंडियाचं भारतातलं सेलिब्रेशनचं प्लॅनिंग ठरलं आहे. देशात आल्यावर टीम इंडिया पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे. तसेच मुंबईत ओपन बसमधून सेलिब्रेशन देखील केलं जाणार आहे.

“सर, मला काहीच येत नाही” म्हणणाऱ्या सुधा मुर्तींचं दमदार भाषण; दोन मागण्यांकडे वेधलं लक्ष

टीम इंडियाच्या या प्लॅनिंगनुसार गुरुवारी भारतात परतल्यानंतर खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेणार आहे त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत. या ठिकाणी ते वानखेडे स्टेडियम जवळ एका ओपन बसमध्ये रॅली काढत सेलिब्रेशन करणार आहेत. तसेच स्टेडियमवर टीम इंडियाच्या विजयाचा छोटासा सोहळा देखील होणार आहे. तसेच त्यानंतर भारतीय खेळाडू त्यांच्या चाहत्यांना नवी दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी भेटी देणार आहेत.

Anant-Radhika Wedding: घरी येणार नवी नवरी! अनंत-राधिकाच्या लग्न फंक्शनला सुरुवात; संगीतपासून ते गेस्टपर्यंत सर्व …

कसं आहे टीम इंडीयाचं भारतात परतल्यानंतरच वेळापत्रक?

– 4 जूनला सकाळी टीम इंडियाची फ्लाईट दिल्लीत लॅंड होणार
– सकाळी 11 वाजता खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेणार
– त्यानंतर ते चार्टर्ड विमानाने मुंबईला रवाना होणार
– मुंबईत पोहचताच ते वानखेडे स्टेडियमवर दाखल होणार
– वानखेडे स्टेडियम पर्यंत ते 1 किमीची ओपन बस परेड करणार
– त्यानंतर वानखेडे स्टेडियम छोटासा कार्यक्रम होईल त्यात रोहित शर्मा बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांना विश्वचषकाची ट्ऱॉफी सुपूर्द करणार.

टीम इंडियाच्या वानखेडे स्टेडियम जवळ एका ओपन बसमध्ये रॅली काढत सेलिब्रेशनबाबत स्वतः बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत माहिती दिली. ते म्हणाले की, टीम इंडियाच्या विश्वचषक विजयाचा गौरव करणाऱ्या विजय परेडसाठी सामील व्हा! आमच्यासोबत आनंद साजरा करण्यासाठी 4 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर

खेळाडूंच्या परतीसाठी BCCI कडून खास प्लॅनिंग…

वादळामुळे खेळाडूंना बार्बाडोसमधून नियोजित वेळेत निघता आले नाही. त्यामुळे बीसीसीआयने खास (BCCI) व्यवस्था केली आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार भारतीय खेळाडू बार्बाडोसमधून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत. उद्या (4 जून) सकाळी खेळाडू दिल्लीत (New Delhi) पोहोचतील. याआधी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी (Jay Shah) सांगितले होते की टीम इंडियाला घेऊनच भारतात परतु. आता सर्व व्यवस्था झाल्यानंतर संघातील खेळाडू मायदेशात परतण्यासाठी तयार आहेत.

follow us