Download App

T20 World Cup 2024 मध्ये आणखी एक हॅट्रिक; ख्रिस जॉर्डनने रचला इतिहास !

टी-20 वर्ल्डकपमध्ये जॉर्डन हा हॅट्रिक नोंदविणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. त्याने 19 ओव्हरमध्ये ही कामगिरी केलीय,

  • Written By: Last Updated:

T20 World Cup 2024 : Chris Jordan Scripts History With Hat-Trick vs USA Super 8 Game : यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये गोलंदाज (T20 World Cup 2024) हे वेगवेगळे विक्रम रचत आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन याने (Chris Jordan) अमेरिकाविरुद्धच्या (USA) सुपर आठच्या सामन्यात हॅट्रिक घेतली आहे. सामन्यात ख्रिस जॉर्डन याने पाच बॉलमध्ये चार फलंदाज बाद करत हा विक्रम केला आहे.

टी-20 वर्ल्डकपमध्ये जॉर्डन हा हॅट्रिक नोंदविणारा इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. त्याने 19 ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर अली खान याला बोल्ड केले. तर पुढील चेंडूवर नोस्तुश केंजिगेला एलबीडब्यू बाद केले. त्याने डीआरएसला घेतला होता. परंतु उपयोग झाला नाही. त्यानंतर जॉर्डनने सौरभ नेत्रवलकर याला बोल्ड करत हॅट्रिक केली. याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर त्याने स्फोटक फलंदाज कोरी अँडरसनला बाद केले. अमेरिका संघ 115 धावांत ऑलआऊट झाला आहे. 116 धावांचे लक्ष्य इंग्लंडने दहाव्या ओव्हरमध्ये गाठले आहे.


NEET Exam Scam: अधिकाऱ्याचे कपडे फाडले, ड्रायव्हरला मारहाण; छापेमारीसाठी गेलेल्या सीबीआयच्या टीमवर हल्ला

वर्ल्डकपमधील नववी हॅट्रिक
टी-20 वर्ल्डकपमध्ये हॅट्रिक करणारा ख्रिस जॉर्डन हा आठवा गोलंदाज आहे. ब्रेट लीने 2007च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये हॅट्रिक केली होती. तर 2009 ते 2016 पर्यंतच्या वर्ल्ककपमध्ये एकही गोलंदाज सलग तीन फलंदाज बाद करू शकला नव्हता. त्यानंतर 2021 आणि 2022 मध्ये दोन गोलंदाजांनी अशी कामगिरी बजावली होती. या वर्ल्डकपमध्ये पॅट कॅमिन्सने दोन हॅट्रिक आपल्या नावावर केल्या आहेत. त्यानंतर क्रिस जॉर्डनने ही कामगिरी केली आहे.

पुणे ड्रग्ज प्रकरणी हॉटेल मालकासह पाच जण ताब्यात; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिस अ‍ॅक्शनमध्ये

आतापर्यंत टी-वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक
ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) vs बांग्लादेश- 2007
कर्टिस कॅंपर (आर्यलँड) vs नेदरलँड, 2021
वानिंदु हसरंगा (श्रीलंका) vs दक्षिण अफ्रिका, 2021
कगिसो रबाडा (दक्षिण अफ्रीका) vs इंग्लंड, 2021
कार्तिक मयप्पन (यूएई) vs श्रीलंका, 2022
जोशुआ लिटिल (आर्यलँड) vs न्यूझिलँड, 2022
पॅट कमिंस (ऑस्ट्रेलिया) vs बांग्लादेश- 2024
पॅट कमिंस (ऑस्ट्रेलिया) vs अफगाणिस्तान, 2024
ख्रिस जॉर्डन (इंग्लंड) vs अमेरिका, 2024

follow us