मोठी बातमी, अमेरिकेत विमान अपघात, 15 घरांना आग

मोठी बातमी, अमेरिकेत विमान अपघात, 15 घरांना आग

Plane Crash In San Diego : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील (California) सॅन दिएगो शहरात विमान अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, सॅन दिएगो (San Diego) शहरातील मर्फी कॅन्यन परिसरात एक विमान कोसळले. टियरासांता जवळील स्कल्पिन स्ट्रीट आणि सॅंटो रोड दरम्यान हा अपघात झाला. या अपघातानंतर स्फोट झाला आणि 15 घरांमध्ये आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत अनेक जणांचा मृत्यू झाला असल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे या अपघातानंतर सॅन दिएगो पोलिस विभागाने X वर पोस्ट करत लोकांना त्या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत अशी माहिती पोलिसांकडून एक्स वर देण्यात आली आहे. अपघातामुळे, सॅल्मन, सॅम्पल आणि स्कल्पिन रस्त्यांवरील रहिवाशांना जवळच्या परिसरातून बाहेर काढण्यात आले. शिल्ड्स स्ट्रीटवरील मिलर प्राथमिक शाळा तात्पुरत्या मदत केंद्रात रूपांतरित करण्यात आली आहे. मात्र विमानात किती लोक होते आणि कोणी गंभीर जखमी झाले आहे का? याबाबत आतापर्यंत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

माध्यमांशी बोलताना अग्निशमन विभागाचे सहाय्यक प्रमुख डॅन एडी (Dan Eddy) म्हणाले की, अपघातानंतर जेट इंधन परिसरात पसरले होते आणि प्रत्येक घराची तपासणी करणे आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे उद्दिष्ट आहे. त्यांनी सांगितले की विमान अपघाताच्या वेळी परिसरात दाट धुके होते आणि पुढे पाहणे कठीण होते. हे विमान सेस्ना 550 म्हणून ओळखले गेले होते जे मॉन्टगोमेरी-गिब्स एक्झिक्युटिव्ह विमानतळाकडे जात होते.

सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ मोबाईल नंबरवर UPI करू शकणार नाही; कारण काय?

या अपघाताची चौकशी आता फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) यांच्या संयुक्त पथकाकडून केली जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube