Download App

बुमराह-हार्दिकचा चिवट मारा, विराटची बॅट अन् सूर्याचा कॅच; भारताच्या विजयाचे टर्निंग पॉइंट

विश्वचषकाच्या विजेतेपदाचे खरे हिरो कोण? ज्यांच्या अफलातून कामगिरीने विजयाचा मार्ग सोपा केला याची माहिती घेऊ या.

IND vs SA Final : टी 20 वर्ल्डकपमध्ये विजय साकारत टीम इंडियाने अकरा वर्षांचा (IND vs SA Final) दुष्काळ संपवला. अंतिम सामन्यात सांघिक खेळाचे प्रदर्शन करत थरारक पद्धतीने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला.  अंतिम ओव्हरपर्यंत या सामन्यातील थरार कायम होता. एक वेळ अशी आली होती की भारताच्या हातून (Team India) सामना निसटेल की काय अशी शंका येत होती. परंतु, मैदानातील संघातील खेळाडूंची कामगिरीच निर्णायक ठरली आणि टीम इंडियाच्या शिलेदारांनी विश्वचकावर नाव कोरलं. आता या (ICC T20 World Cup 2024) विजेतेपदाचे खरे हिरो कोण? ज्यांच्या अफलातून कामगिरीने विजयाचा मार्ग सोपा केला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना.. चला तर मग आज आपण याच शिलेदारांची माहिती घेऊ या..

या सामन्यात प्रत्येक खेळाडूनेच आपले योगदान देत संघाच्या विजयात वाटा उचलला. पण तरीही काही खेळाडू असे होते ज्यांची कामगिरी निर्णायक ठरली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वीस ओव्हर्समध्ये 176 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 177 धावा करायच्या होत्या. धावा जास्त असल्याने वेगाने खेळावे लागणार होते. आफ्रिकेच्या फलंदाजांनी भरपूर प्रयत्नही केला. पण, भारतीय खेळाडू आणि गोलंदाजांमोर अखेर आफ्रिकेला शरणागती पत्करावा लागली.

विराट कोहली

तसं पाहिलं तर या संपूर्ण विश्वचषकात विराटची बॅट (Virat Kohli) शांतच राहिली. विराट ज्या कामगिरीसाठी ओळखला जातो ती कामगिरी त्याच्याकडून आतापर्यंत झाली नव्हती. त्यामुळे विराट नक्की करतोय तरी काय असा काळजीचा सवाल चाहत्यांच्या मनात यायचाच. आता फायनल सामन्यात तरी विराटने धावांचा पाऊस पाडावा अशी अपेक्षा होती. घडलंही तसंच. या सामन्यात सुरुवातीलाच भारताला रोहित, पंत आणि सूर्यकुमार बाद होऊन तीन धक्के बसले होते. 34 धावांवरच तीन आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचे टेन्शन वाढले होते. संघही दडपणात आला होता.

1983 ते 2024.. एकही सामना न खेळता ठरले चॅम्पियन; ‘या’ खेळाडूंचं टायमिंगही खास

अशा कठीण प्रसंगात अखेर विराट धावून आला. त्याने अक्षर पटेलच्या साथीने (Axar Patel) भारताचा डाव साकारला. अक्षर पटेल चांगला खेळतोय हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे विराट हुशारीने संयमी खेळ करत स्ट्राईक बदलत राहिला. दुसरीकडे अक्षरनेही चौकार षटकारांचा वर्षाव करत धावांची गती कमी होऊ दिली नाही. विराटने या सामन्यात 59 चेंडूत 76 धावा केल्या. तसेच अक्षर पटेलबरोबर 72 धावांची निर्णायक भागीदारी केली. या सामन्यात विराटलाच सामनावीराच्या पुरस्कारारने गौरवण्यात आलं.

अक्षर पटेल

या सामन्यात एक वेळ अशी आली होती की भारत सामना गमावतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु संघ व्यवस्थापनाने (Rohit Sharma) घेतलेले निर्णय मास्टरस्ट्रोक ठरले. यातलाच एक निर्णय म्हणजे अक्षर पटेल. सुरुवातीलाच आफ्रिकेच्या गोलंदाजांनी विकेट घेत भारताच्या फलंदाजांवर दडपण आणले. एक वेळी तर 34 धावांतच भारताचे तीन आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. कर्णधार रोहित शर्मा 9, ऋषभ पंत 0, सूर्यकुमार यादव 3 अशी गळती लागली होती. त्यामुळे सगळेच टेन्शनमध्ये आले होते. यानंतर संघ व्यवस्थापनाने धाडसी निर्णय घेत डाव्या हाताच्या अक्षर पटेल याला (Axar Patel) मैदानात पाठवलं. हा निर्णय कमालीचा यशस्वी ठरला.

अक्षरने विराट बरोबर मजबूत भागीदारी करत संघाचा डाव सावरला तसेच धावांची गती सुद्धा कमी पडू दिली नाही. अक्षरने 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शिवम दुबे (Shivam Dubey) आणि हार्दिक पांड्या यांच्या (Hardik Pandya) आधी अक्षरला पाठवणे हा खरच मास्टर स्ट्रोक ठरला. ज्यावेळी रोहित, पंत आणि सूर्या बाद झाले त्यावेळी कुणालाच वाटलं नव्हतं की भारताच्या 170 धावा होतील. पण अक्षरच्या खेळीने भारताला अडचणीच्या काळात सावरलं. पण, गोलंदाजीत अक्षर पटेल चांगलाच महागडा ठरला. आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर जास्त धावा घेतल्या. अक्षरने चार ओव्हर्समध्ये 49 धावा देत फक्त एक विकेट मिळवली.

एकीकडं आनंद तर दुसरीकडं दु:ख; ऐतिहासीक विजयानंतर रोहित-विराटची ‘टी 20’मधून निवृत्ती

जसप्रित बुमराह

या संपूर्ण विश्वचषकात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने अतिशय (Jasprit Bumrah) चिवट गोलंदाजी केली. धावा तर कमी दिल्याच शिवाय वेळेवर ज्यावेळी संघाला गरज होती तेव्हा विकेटही मिळवून दिल्या. या सामन्यात सुरुवातीला धक्के बसल्यानंतर क्विंटन डिकॉकने आफ्रिकेचा डाव सावरला होता. त्यावेळी भारत पराभूत होतो की काय अशी शंका सगळ्यांनाच येत होती. सामना जिंकायचा असेल तर विकेट घेणे हाच पर्याय होता. त्यामुळे सोळावी ओव्हर बुमराहला देण्यात आली. या ओव्हरमध्ये त्याने फक्त 4 रन दिले. त्यानंतर पुन्हा अठराव्या ओव्हरमध्ये तर फक्त दोन रन देत 1 विकेटही घेतली ज्याची भारताला गरज होती. शेवटच्या टप्प्यातील त्याची गोलंदाजी निर्णायक ठरली. जसप्रित बुमराहला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सूर्यकुमार यादव

टी 20 विश्वचषकात दीर्घ काळ आठवणीत राहिल अशी खेळी सूर्यकुमारला करता (Suryakumar Yadav) आली नाही. बहुतांश सामन्या त्याची बॅट शांतच होती. फायनल सामन्यातही सूर्या लवकरच तंबूत परतला होता. या सामन्यात त्याने फलंदाजी केली नसली तरी त्याची कसर फिल्डिंगमध्ये भरून काढली. या सामन्यात त्याने एक कॅच असा पकडला की तोच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. क्रिकेटमध्ये नेहमीच कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्यत सूर्याच्या या अफलातून कॅचने पुन्हा आणून दिला. सामन्यातील अखेरच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरचा (David Miller) कॅच थेट बाऊंड्रीवर सूर्यकुमार यादवने पकडला. जर हा कॅच सुटला असता तर सामन्याचं चित्र नक्कीच वेगळं राहिलं असतं कारण शेवटच्या ओव्हरमध्ये मिलर ज्या पद्धतीने खेळत होता त्यामुळे सामना आफ्रिकेच्या बाजूने झुकत चालला होता.

IND vs SA : टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक! प्रमोशन दिलं अन् ‘बापू’ने सामनाच फिरवला

हार्दिक पांड्या

दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा हव्या होत्या. अर्शदीप सिंह (Arshadeep Singh) आणि जसप्रित बुमराहच्या चार-चार ओव्हर टाकून झाल्या होत्या. त्यामुळे शेवटची ओव्हर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) देण्यात आली. या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने डेव्हिड मिलरला तंबूत धाडलं. यानंतरही हार्दिक पांड्याने चिवट गोलंदाजी करत फक्त 8 धावा दिल्या आणि टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अर्शदीप सिंह

वेगवान गोलंदाज अर्शदीपनेही सामन्यात चिवट गोलंदाजी केली. त्याने फेकलेल्या चेंडूंवर आफ्रिकेचे फलंदाज अडखळताना दिसत होते. आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम पॉवर प्लेच्या आत बाद झाला. अर्धशतकाकडे वाटचाल करत भारतासाठी धोकादायक ठरू लागलेला डिकॉकही तंबूत परतला. अर्शदीपने त्याच्या चार ओव्हर्सच्या स्पेलमध्ये फक्त 20 रन देत दोन महत्वाच्या विकेट मिळवून दिल्या. क्विंटन डिकॉकची घेतलेली विकेटही टीम इंडियाच्या विजयात निर्णायक ठरली.

follow us

वेब स्टोरीज