T20 World Cup Rinku Singh Father emotional due to Rinku not in playing Eleven : टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी भारतीय संघाची ( T20 World Cup ) बीसीसीआयकडून (BCCI) घोषणा करण्यात आली आहे. या संघाचं नेतृत्व रोहित शर्मा तर उपकर्णधार हार्दिक पांड्या आहे. तर या संघात के. एल. राहुलला स्थान देण्यात आले नाही. तसेच तर याच बरोबर रिंकू सिंग, ( Rinku Singh ) शुभमन गिल, आवेश खान आणि खालील अहमदला राखीव ठेवले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना रिंकू सिंगचे वडिल भावूक ( Father emotional ) झाल्याचं पाहायला मिळालं.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 10 वी पास उमदेवारांना नोकरीची संधी, महिन्याला 63 हजार रुपये पगार
Rinku Singh's father said, "we bought crackers and celebrated as we thought Rinku would be in the Playing XI. Rinku called his mother and broke the news, he was heartbroken". (News24). pic.twitter.com/z6n7BPTkDV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 1, 2024
माध्यमांशी बोलताना रिंकूच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली की, टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी भारतीय संघात रिंकूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल म्हणून आम्ही खुप उत्सुक होतो. भारताचा विजय साजरा करण्यासाठी आम्ही फटाके देखील घेऊन ठेवले आहेत. पण रिंकूचा त्याच्या आईला फोन आला की, त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झालेली नाही. हे सांगताना तो देखील दुखावलेला होता. असं त्याचे वडिल म्हणाले.
मोदींच्या राजवटीत हुकुमशाही, प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी दृष्टी मोदींकडे…; पवारांची टीका
दरम्यान संघात रिंकूची निवड न झाल्याने चाहते देखील नाराज आहेत. त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. की, रिंकू संघात हवा होता. सोशल मिडीयावर चाहत्यांनी याबद्दल राग व्यक्त केला आहे. तसेच काही समालोचक आणि विश्लेषकांनी देखील त्यावर आपलं मत नोंदवलं आहे. तर आता रिंकूच्या निवडीवरून त्याच्या घरी देखील नाराजी असल्याचं दिसत आहे.
‘अपेक्षितच उमेदवारी! मी अजिबात नाराज नाही’; भुजबळ गोडसेंच्या उमेदवारी खूश
T20 World Cup 2024 मध्ये भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध होणार आहे तर 9 जून रोजी भारत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार आहे. यूएसए विरुद्ध 12 जून रोजी तर 15 जून रोजी भारतीय संघ कॅनडा विरुद्ध सामना खेळणार आहे.
T20 World Cup 2024 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.