Rinku Singh : टीम इंडियासाठी गुडन्यूज! इंग्लंडविरुद्ध ‘या’ स्टार खेळाडूची संघात एन्ट्री; इशानचा पत्ता कट

Rinku Singh : टीम इंडियासाठी गुडन्यूज! इंग्लंडविरुद्ध ‘या’ स्टार खेळाडूची संघात एन्ट्री; इशानचा पत्ता कट

BCCI Announced Rinku Singh Selected in Team India For England Test Series : अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात (IND vs ENG) कसोटी मालिका होणार आहे. यासाठी इंग्लंडचा संघ लवकरच भारतात दाखल होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) सराव शिबिरे सुरू होणार आहेत. या मालिकेआधी संघासाठी गुडन्यूज मिळाली आहे. टीम इंडियाचा नवोदित धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh) याची भारत अ संघात एन्ट्री झाली आहे. बीसीसीआयनेच याबाबत घोषणा केली आहे. येत्या 25 जानेवारीपासून पहिली कसोटी हैदराबाद येथे सुरू होणार आहे.

‘आधी मॅच टाय, सुपर ओव्हरही टाय नंतर टीम इंडियाच विनर’ भारत-अफगाणिस्तान सामन्यात क्रिकेटचा थरार

या कसोटी मालिकेबरोबरच या दोन्ही संघात आधी आणखी एक मालिका सुरू झाली आहे. भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातही कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना 17 जानेवारीला सुरू झाला. हा सामना अहमदाबाद येथे होत आहे. या सामन्यानंतर आणखी दोन सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांसाठी संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे.

या दोन्ही संघांसाठी खेळाडूंची घोषणा झाली आहे. या संघात रिंकू सिंहला संधी मिळाली आहे. याआधी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी 20 मालिकेतही त्याला संधी मिळाली होती. रिंकू सध्या उत्तर प्रदेश संघाकडून खेळत आहे. या संघात तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर यांनाही संधी मिळाली आहे. मात्र इशान किशनला (Ishan Kishan) येथेही डावलण्यात आले आहे. इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी मानसिक थकव्याचे कारण देत माघार घेतली होती. तेव्हापासून तो संघाबाहेरच आहे.

World Cup : दहा वर्षात नऊ नॉकआऊट मॅचेसमध्ये पराभव : टीम इंडिया बनली ‘नवी’ चोकर्स?

टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले की इशानने स्वतःहून निवडीसाठी उपलब्ध होऊ दिले नाही. आता त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. मात्र तरीही तो रणजी क्रिकेटपासून दूर राहिला. आता भारत अ संघातही त्याची निवड झाली नाही.  या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, तिलक वर्मा, कुमार कुशाग्रा, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, अर्शदीप सिंग, तुषार देशपांडे, विद्वत कावेरप्पा, उपेंद्र यादव आणि यश दयाल असा संघ राहिल.

तिसऱ्या सामन्यासाठी अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, तिलक वर्मा, कुमार कुशाग्रा, वॉशिंग्टन सुंदर, शम्स मुलानी, अर्शदीप सिंग, तुषार देशपांडे, विद्वत कावेरप्पा, उपेंद्र यादव, यश दयाल आणि आकाश दयाल असा संघ राहिल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज