बॉलिवूडमधील कठीण काळाबद्दल बोलताना देओल भावंडं झाले भावूक; म्हणाले, ‘खूप वर्षे…’

बॉलिवूडमधील कठीण काळाबद्दल बोलताना देओल भावंडं झाले भावूक; म्हणाले, ‘खूप वर्षे…’

Bobby Deol Gets Emotional: 2023 हे वर्ष देओल कुटुंबाच्या नावावर होते. (Deol family) ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) धर्मेंद्रने खळबळ माजवली, तर सनी देओलच्या (Sunny Deol) ‘गदर 2’ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. यानंतर बॉबी देओलने (Bobby Deol) ‘ॲनिमल’मधील अबरारच्या भूमिकेने सर्वांची मन जिंकताना पाहायला मिळाला आहे. देओल बंधू आता नेटफ्लिक्सवरील कपिल शर्माच्या शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या (The Great Indian Kapil Show) आगामी एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून दिसणार आहेत. निर्मात्यांनी मंगळवारी आगामी भागाचा ट्रेलर रिलीज केला, यामध्ये कपिल शर्मा आणि त्याची टीम सनी आणि बॉबीसोबत खूप मजा करताना दिसत आहे. यादरम्यान सनी आणि बॉबीही भावूक होताना दिसत आहेत.

‘द ग्रेट कपिल शो’मध्ये सनी-बॉ बी झाले भावुक

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या शोच्या टीझरमध्ये सनी आपल्या कुटुंबासाठी किती चांगले वर्ष गेले हे सांगताना दिसत आहे. म्हणाला की, ‘ते 1960 पासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत आणि अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते पण काही गोष्टी घडत नव्हत्या. माझ्या मुलाचं लग्न झालं, त्यानंतर ‘गदर’ आला, त्याआधी माझ्या वडिलांचा चित्रपट आला यावर विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर ऍनिमल सिनेमा आला. हे ऐकून बॉबी देओल भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले.

सनीचे वडिलांसोबतचे नाते कसे आहे?

यावेळी सनीने आपल्या वडिलांसोबतच्या नात्याबद्दल माहिती दिली आणि सांगितले की, “माझे वडील मला त्यांच्यासोबत बसून मित्रासारखे बोलण्यास सांगतात. मी त्यांना सांगतो की जेव्हा मी तुमच्याशी मित्रासारखे बोलतो तेव्हा तुम्ही वडिलांसारखे वागू लागता. यादरम्यान बॉबी देओलने गंमतीत सांगितले की, देओल खूप रोमँटिक आहेत.

Sudhir Phadke : ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मध्ये ‘हे’ मुख्य कलाकार साकारणार ‘या’ व्यक्तिरेखा

सनी बॉबीने खळबळ उडवून दिली

या शोमध्ये देओल भाई देखील खूप हसताना दिसणार असल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. यावेळी कृष्णा अभिषेक ॲनिमलमध्ये बॉबीच्या अबरारच्या लूकमध्ये दिसणार आहे. प्रेक्षकांना सनी देओल आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील मजेशीर क्षणांची झलक पाहायला मिळणार आहे. यामध्ये ग्रोव्हर इंजिनियर चुंबक मित्तलची भूमिका साकारताना दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज