Download App

IND vs AUS: रोहित शर्माची तुफानी खेळी; भारताचे ऑस्ट्रेलियाला दोनशेहून अधिक धावांचे ‘टार्गेट’

रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यात 19 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याचे आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वात हे वेगवान अर्धशतक आहे.

  • Written By: Last Updated:

IND vs AUS : टी-20 वर्ल्डकपमधील (T20 World Cup) सुपर आठ फेरीच्या महत्त्वाच्या लढतीत भारताने (India) ऑस्ट्रेलियासमोर 205 धावांचे मोठे टार्गेट ठेवले आहे. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. शर्माने अवघ्या 19 चेंडूत तुफानी अर्धशतक झळकवले. या वर्ल्डकपमध्ये वेगवान अर्धशतक झळकविणारा तो फलंदाज ठरलाय. पण रोहित शर्माचे शतक मात्र हुकले. तो 92 धावांवर बाद झाला. धुलाई झालेला वेगवान गोलंदाज मिचेल स्टॉर्कनेच रोहितचा बोल्ड केले. शर्माने 41 चेंडू खेळला. त्यात त्याने तब्बल आठ षटकार आणि सात चौकार कुटले. त्याने स्टॉर्कच्या एका ओव्हरमध्ये चार षटकार आणि एक चौकार मारत त्याची जबरदस्त धुलाई केली.

IND vs AUS: मिचेल स्टॉर्कच्या चिंध्या उडवत हिटमॅन रोहितने अर्धशतक ठोकले !

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. विराट कोहली खाते न खोलताच माघारी फिरला. त्याला जोश हेजलवुडने झेलबाद केले. रिषभ पंतही 15 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 31 धावा कुटल्या. सूर्यकुमारच्या रुपाने भारताला चौथा झटका बसला. त्यानंतर शिवम डुबे आणि हार्दिक पंड्याने जबरदस्त खेळी करत संघाची धावसंख्या पुढे नेली.

सर्वात वेगवान अर्धशतक

रोहित शर्माने या सामन्यात 19 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याचे आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वात हे वेगवान अर्धशतक आहे. रोहितने संघाच्या पाचव्या ओव्हरमध्ये अर्धशतक झळकविले आहे. या वर्ल्डकपमध्ये हे सर्वाधिक वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध 22 चेंडूत अर्धशतक झळकविले आहे.

रोहित शर्माचे षटकारांचे ट्वीशतक

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 षटकार मारणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे. या सामन्यापूर्वी त्याने 195 षटकार मारले. त्याने मिचेल स्टॉर्कची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढले. स्टार्कच्या एका ओव्हरमध्ये रोहितने चार षटकार मारले. त्यानंतर त्याने पॅट कमिन्सचा एक षटकार मारला. तो षटकार शंभर मीटर लांब होता. कर्णधार रोहित शर्माचा हा टी-20 कारकीर्दीतील 157 सामना आहे. तो सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा खेळाडू आहे. रोहितनंतर न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने 176 षटकार मारले आहेत. तर इंग्लंडच्या जोस बटलरने 137 षटकार मारले असून, तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

follow us