IND vs AUS: मिचेल स्टॉर्कच्या चिंध्या उडवत हिटमॅन रोहितने अर्धशतक ठोकले !

  • Written By: Published:
IND vs AUS: मिचेल स्टॉर्कच्या चिंध्या उडवत हिटमॅन रोहितने अर्धशतक ठोकले !

IND vs AUS T20 Rohit Sharma Fifty: टी-20 वर्ल्डकपमध्ये ( T20 World Cup) सुपर आठच्या महत्त्वाचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होत आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. विराट कोहली भोपळाही न फोडता बाद झाला. पण कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) तुफानी फटकेबाजी सुरू केली. रोहित शर्माने मिचेल स्टॉर्कची (Mitchell Starc) जबरदस्त धुलाई केली आहे. रोहित शर्मा याने 19 चेंडूत अर्धशतक झळकविले आहे. रोहित शर्मा हा 92 धावांवर बाद झाला. धुलाई झालेल्या मिचेल स्टॉर्कने शर्माला बोल्ड केले. शर्माने 41 चेंडू खेळला. त्यात त्याने तब्बल आठ षटकार आणि सात चौकार कुटले.

त्याने स्टॉर्कच्या ओव्हरमध्ये चार षटकार आणि एक चौकार मारत त्याची जबरदस्त धुलाई केली. स्टार्कला दोन्ही ओव्हर महागात पडल्या. दोन ओव्हरमध्ये त्याने तब्बल 34 धावा दिल्या. त्यात चार षटकार आणि दोन चौकार आहेत. रिषभ पंतही 15 धावांवर बाद झाला आहे. दहा ओव्हरमध्ये भारताच्या दोन विकेट्सच्या बदल्यात 114 धावा झाल्या. रोहित शर्माला सूर्यकुमार यादव साथ देत आहे.

सर्वात वेगवान अर्धशतक
रोहित शर्माने या सामन्यात 19 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याचे आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वात हे वेगवान अर्धशतक आहे. रोहितने संघाच्या पाचव्या ओव्हरमध्ये अर्धशतक झळकविले आहे. या वर्ल्डकपमध्ये हे सर्वाधिक वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध 22 चेंडूत अर्धशतक झळकविले आहे.


षटकारांचे ट्वीशतक

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 षटकार मारणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे. या सामन्यापूर्वी त्याने 195 षटकार मारले. त्याने मिचेल स्टॉर्कची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढले. स्टार्कच्या एका ओव्हरमध्ये रोहितने चार षटकार मारले. त्यानंतर त्याने पॅट कमिन्सचा एक षटकार मारला. तो षटकार शंभर मीटर लांब होता. कर्णधार रोहित शर्माचा हा टी-20 कारकीर्दीतील 157 सामना आहे. तो सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा खेळाडू आहे. रोहितनंतर न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने 176 षटकार मारले आहेत. तर इंग्लंडच्या जोस बटलरने 137 षटकार मारले असून, तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube