T20 World Cup 2026: इंग्लंडचा 51 धावांनी दणदणीत विजयी; लंका अवघ्या 95 धावांत चारीमुंड्या चित !

T20 World Cup 2026-इंग्लंडने लंकेसमोर 147 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर घरच्या मैदानावर खेळतानाही श्रीलंकेचा संघ 95 धावांवर गारद झाला. लंकेचा संघ 17 षटकच खेळू शकला.

England Beat Sri Lanka

England Beat Sri Lanka

T20 World Cup 2026: टी वर्ल्डकपमध्ये सुपर आठमधील (T20 World Cup 2026) पहिल्या सामन्यात इंग्लंडने (England) श्रीलंकेचा (Sri Lanka) 51 धावांनी धुव्वा उडविलाय. इंग्लंडने लंकेसमोर 147 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर घरच्या मैदानावर खेळतानाही श्रीलंकेचा संघ 95 धावांवर गारद झाला. लंकेचा संघ 17 षटकच खेळू शकला.

टी-20 मधील आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडचा श्रीलंकेवर हा सलग 12 विजय आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 18 सामने खेळले आहेत. श्रीलंकेने टी-20 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा विजय 2014 मध्ये मिळवला होता. टी-20 वर्ल्डकपूर्वी पल्लेकेले येथे झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला होता.

TVF ने पूर्ण केला 14 वर्षांचा टप्पा; खास पोस्टद्वारे व्यक्त केला कृतज्ञता भाव


फिल साल्टचे शानदार अर्धशतक

दासुन शनाकाने नाणेफेक जिकंच इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जोस बटलर आणि फिल साल्ट यांनी पहिल्या विकेटसाठी 16 धावा जोडल्या. बटलर 14 चेंडूत सात धाव करून बाद झाला. बेथेलही तीन धावांवर तंबूत परतला. टॉम बँटन आणि हॅरी ब्रूक हेही दोघे झटपट बाद झाले. पण फिल साल्टने डाव सावरत शानदार अर्धशतक झळकविले. त्याने 40 चेंडूत 2 षटकार आणि सहा चौकारांसह 62 धावा काढल्या. विल जॅक्सने 21 धावा काढून संघाला 146 धावांपर्यंत पोहोचविले. दुनिथ वेल्लालागेने 26 धावांत सर्वाधिक ३ बळी घेतले. दिलशान मदुशंका आणि महेश थिकशनाने प्रत्येकी २ बळी घेतले.


मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 32 तासांच्या खोळंब्यानंतर दिलासा; 5.16 कोटींचा टोल परतावा जाहीर


घरच्या मैदानावर लंकेच्या फलंदाजांनी शेपूट घातले

घरच्या मैदानावर श्रीलंकेचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. इंग्लंडने पॉवरप्लेमध्येच त्यांचा अर्धा संघ बाद केला. पथुम निस्सांका हा 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर विल जॅक्सने कुसल मेंडिस आणि पवन रत्नायके यांना सलग चेंडूंवर बाद केले. कामिल मिशारा सहा धावांवर बाद झाला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात विल जॅक्सने दुनिथा वेलालेजला बाद केले. त्यामुळे लंकेची अवस्था बिकट झाली. 34 धावांवर अर्धासंघ बाद झाल्याने श्रीलंका पराभवाच्या छायेत गेली. त्यानंतर तळाचे फलंदाजही संघासाठी मजबूत खेळी करू शकले नाही. दासुन शनाका आणि कामिंदू मेंडिसने सहाव्या विकेटसाठी 18 धावांची भागिदारी केली. हीच लंकेचे सर्वोच्च भागिदारी ठरली. शनाकाने सर्वाधिक 30 धावा केल्या. विल जॅक्स तीन बळी घेत सामनावीर ठरला. तर जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

Exit mobile version