Duleep Trophy 2024 : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या दुलीप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) साठी बीसीसीआयने (BCCI) चार संघांची घोषणा आज केली आहे. बीसीसीआयने दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या फेरीच्या सामन्यांसाठी संघांची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर, शुभमन गिल, अभिमन्यू इसवरन आणि रुतुराज गायकवाड यांच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ए टीमचा कर्णधार शुभमन गिल असणार आहे तर बी टीमच्या कर्णधार पदाची जबाबदारी अभिमन्यू इसवरनकडे आणि टीम सीच्या कर्णधार पदाची जबाबदारी रुतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यर टीम डीचा कर्णधार असणार आहे.
दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये 12 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग घेणार आहे. याचा मुख्य करणार म्हणजे भारतीय संघाला पुढील महिण्यापासून 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे बीसीसीआय दुलीप ट्रॉफी 2024 सर्व खेळाडूंना खेळण्याची विनंती केली आहे. ही स्पर्धा 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सर्व सामने खेळवण्यात येणार आहे. याच बरोबर पुढील महिन्यात बांगलादेश विरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी ज्या खेळाडूंची भारतीय संघात निवड होईल त्यांना दुलीप ट्रॉफीच्या बाहेर ठेवण्यात येईल आणि त्यांच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्यात येईल अशी देखील माहिती बीसीसीआयने दिली आहे.
🚨 NEWS 🚨
Squads for first round of #DuleepTrophy 2024-25 announced
All The Details 🔽 @IDFCFIRSTBankhttps://t.co/EU0RDel975
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 14, 2024
स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी चार संघ
टीम अ: शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीद कृष्णा, खलील अहमद, आवेश खान , विदावथ कावरप्पा, कुमार कुशाग्र आणि शाश्वत रावत.
टीम ब: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी (फिटनेसच्या अधीन), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर. साई किशोर, मोहित अवस्थी आणि एन जगदीसन (यष्टीरक्षक).
टीम क: रुतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, उमरान मलिक, विशाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशू चौहान, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल (विकेटकीपर) आणि संदीप वॉरियर.
BCCI कडून मोठी घोषणा, ‘या’ दिग्गज खेळाडूची टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड
टीम ड : श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (यष्टीरक्षक), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भगत (यष्टीरक्षक) आणि सौरभ कुमार.