Download App

थरारक सामन्यात भारताचा दोन धावांनी विजय

मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात दोन धावांनी थरारक विजय मिळवला. पदार्पणाच्या सामन्यात शिवम मावीनं चार बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेला अखेरच्या चेंडूवर चार धावा हव्या होत्या. त्यावेळी दिलशान मदुशंका रनआऊट झाला आणि हा थरारक सामना भारताने दोन धावांनी जिंकला.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये पाच बाद 162 धावा केल्या. दीपक हुडाने 23 चेंडूंमध्ये नाबाद 41 तर अक्षर पटेलने 20 चेंडूंमध्ये नाबाद 31 धावांची खेळी केली.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंका संघाचे ठरावीक अंतरावर विकेट पडत गेल्या. श्रीलंकेकडून कर्णधार दसुन शनाकाने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली.

त्याशिवाय वानंदु हसरंगा 21, चामिरा करुनार्त्ने 23 तर कुसर मेंडिसने 28 धावांची खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. श्रीलंकेला 20 षटकांमध्ये 160 धावांची मजल मारता आली.

श्रीलंका संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पदार्पण करणाऱ्या शूभमन गिल याला महेश तिक्ष्णा याने सात धावांवर माघारी धाडले. त्यानंतर फॉर्मात असणाऱ्या सूर्यकुमार यादव याला चामिरा करुणारत्ने याने तंबूचा रस्ता दाखवला. संजू सॅमसनलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले.

दीपक हुड्डानं 23 चेंडूत 41 धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलनं 20 चेंडूत 31 धावांची खेळी केली. इशन किशननं 29 चेंडूत 37 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्यानं 27 चेंडूत 29 धावांची खेळी केली. वानिन्दु हसरंगा, चामिका करुणारत्ने, महेश तिक्ष्णा, आणि दिलशान मदुशंका यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

Tags

follow us