India Tour Of South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबर रोजी टी-20 सामन्याने होईल. दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.पहिला सामना 10 डिसेंबर रोजी सेंट जॉर्ज पार्कवर होणार आहे. यानंतर दुसरा टी-20 12 डिसेंबरला खेळवला जाईल. त्याचवेळी, या मालिकेतील तिसरा टी-20 जोहान्सबर्ग येथे 14 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार 9.30 वाजता सामने सुरू होतील.
T20 नंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक कसं आहे?
टी-20 सामन्यांनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे. तर मालिकेतील दुसरा सामना 19 डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतर तिसरा वनडे सामना 21 डिसेंबर रोजी पार्ल येथे खेळवला जाईल. पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. मात्र मालिकेतील शेवटचे दोन सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता सुरू होतील.
TMKOC: ‘बंद करा हा शो..’ ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक संतापले
टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघ कसोटी फॉरमॅटमध्ये आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तर दुसरी कसोटी भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता खेळवली जाईल.
येथे होईल सामन्याचे थेट प्रेक्षपण
भारतीय चाहत्यांना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येणार आहे. याशिवाय, डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेता येणार आहे. तसेच, चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारवर हिंदी-इंग्रजीसह विविध भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेता येणार आहे.
WhatsApp वर येतंय भन्नाट फीचर! इंस्टाग्रामवर थेट स्टेटस शेअर करता येणार…
मालिकेसाठी भारताचा T20 संघ-
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ-
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार) (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर
Fighter First Look: हृतिक रोशनच्या ‘फायटर’चा फर्स्ट लूक आऊट!
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.