IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर यजमान वेस्ट इंडिज संघाचा डाव अवघ्या 114 धावांवर आटोपला. विजयासाठी मिळालेले 115 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने 5 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण करत सामना जिंकला. (Team Indies beat West Indies by 5 wickets, Ishaan’s brilliant half century)
भारताची सुरुवात निराशाजनक राहिली सलामीवीर शुभमन गिल 7 धावा करून माघारी पररतला. त्याच्या नंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने ईशान किशनला चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार 19 धावकरून बाद झाला. हार्दिक पांड्या अपयशी ठरला तो 5 धावाकरून धावबाद झाला. या सर्वामध्ये ईशान किशनने आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु तो भारतीय संघाला विजय मिळून देऊ शकला नाही. तो 52 धावा करून बाद झाला.
शार्दूल ठाकूर 1 धावकरून बाद झाला कर्णधार रोहित शर्मा आज सात नंबरला खेळायला आला. त्यांने रवींद्र जडेजासोबत सहाव्या विकेसाठी 18 धावांची भागीदारीकरत भारताला विजय मिळून दिला.
तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर विंडीज संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 2 धावा करून हार्दिक पंड्याचा बळी ठरलेल्या काईल मेयर्सच्या रूपाने संघाने 7 धावांवर आपली पहिली विकेट गमावली. यानंतर 45 धावांवर संघाला 2 धक्के बसले, त्यात मुकेश कुमारने अथानाजला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचवेळी शार्दुल ठाकूरने ब्रँडन किंगला त्याच्या वैयक्तिक स्कोअरवर17 धावांवर त्याच्या सर्वोत्तम चेंडूवर बोल्ड केले.
IND vs WI: टीम इंडियाला मोठा धक्का, मोहम्मद सिराज एकदिवसीय मालिकेतून बाहेर
पुढे शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार शाई होप यांच्यात 43 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. परंतु रवींद्र जडेजाने 88 धावांवर हेटमायरच्या रूपाने विंडीज संघाला चौथा धक्का दिला. आणि हि भागीदारी तोडली 96 च्या स्कोअरवर संघाला 5वा धक्का रोवमन पॉवेलच्या रूपाने बसला.
रवींद्र जडेजाच्या फिरकी गोलंदाजीसमोर झुंजणाऱ्या विंडीजच्या फलंदाजांसाठी कुलदीप यादवची फिरकी खेळणे आणखी कठीण ठरले. 99 धावांवर विंडीज संघाने डॉमिनिक ड्रेक्सच्या रूपाने आपली 7वी विकेट गमावली. यानंतर, 114 धावांवर, कर्णधार शाई होपच्या रूपाने संघाला 9वा धक्का बसला, जो 43 च्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात विंडीज संघाचा डाव 114 धावांवरच मर्यादित राहिला.
कुलदीप यादवने 3 षटकांच्या गोलंदाजीमध्ये 2 मेडन षटकांसह अवघ्या 6 धावांत 4 बळी घेतले. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने 6 षटकांत 37 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय हार्दिक पांड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनीही 1-1 विकेट घेतली.