T20 World Cup : पुढील महिन्यापासून टी20 विश्वचषक 2026 ची सुरुवात होणार असून या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ 7 फेब्रुवारी रोजी आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
भारतीय संघाचे (Team India) दोन स्टार खेळाडू लवकरच भारतीय संघात परतणार आहे. विजय हजारे ट्रॉफी दरम्यान फलंदाज तिलक वर्माला दुखापत झाली होती. त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्ध (INDVsNZ) सुरु असणाऱ्या टी20 मालिकेत संधी मिळाली नव्हती. तर वॉशिंग्टन सुंदरला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान साईड स्ट्रेनचा त्रास झाला होता, ज्यामुळे तो या मालिकेतून बाहेर पडला होता. मात्र आता दोन्ही स्टार खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असून लवकरच भारतीय संघात परतणार आहे.
माहितीनुसार, तिलक वर्मा (Tilak Verma) 3 फेब्रुवारी रोजी भारतीय संघात परतणार आहे. तर दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) देखील पूर्णपणे तंदुरुस्त होण्याच्या अगदी जवळ आहे. त्याने फलंदाजी सुरू केली आहे आणि लवकरच गोलंदाजी सुरू करेल.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर.
Make way for @IamSanjuSamson in 𝗚𝗼𝗱’𝘀 𝗼𝘄𝗻 𝗰𝗼𝘂𝗻𝘁𝗿𝘆 😉
🎥 Don’t miss this banter between friends Sanju Samson and Captain Surya Kumar Yadav 😄#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFirstBank | @surya_14kumar pic.twitter.com/zBAFPmZJGk
— BCCI (@BCCI) January 30, 2026
सुनेत्रा पवार अन् परिवाराशी चर्चा करणार, उपमुख्यमंत्रिपदावर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
टी20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघाचे वेळापत्रक
7 फेब्रुवारी – भारत विरुद्ध अमेरिका
12 फेब्रुवारी – भारत विरुद्ध नामीबिया
15 – फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान
18 फेब्रुवारी – भारत विरुद्ध नेदरलँड
