Download App

शानदार, विनेश फोगटची उपांत्यपूर्व फेरीत धडक, गतविजेत्याला दाखवलं आसमान

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) अकराव्या दिवशी महिला (50 किलो गटात) विनेश फोगटने दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिक

  • Written By: Last Updated:

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympics) अकराव्या दिवशी महिला (50 किलो गटात) विनेश फोगटने दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन (Tokyo Olympic 2020) यु सुझुकीचा (Yui Susuki) पराभव केला आहे. याच बरोबर आता ती उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे.

या सामन्याच्या पहिल्या राऊंडमध्ये युई सुझुकीने टेक्निकल काउंटच्या मदतीने आघाडी घेतली होती. मात्र या सामन्याच्या शेवटच्या 15 सेकंदात विनेशने शानदार कामगिरी करत सामना आपल्याकडे वळवला आणि 3-2  अशी आघाडी घेतली मात्र या आघाडीला जपानकडून आव्हान देण्यात आले मात्र शेवटी निर्णय भारताच्या बाजूने आला. अशाप्रकारे विनेश फोगटने महिला कुस्तीमध्ये भारतासाठी पदक मिळवण्याच्या दिशेने आणखी एक मजबूत पाऊल टाकले आहे. आता पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत विनेश फोगटचा सामना युक्रेनच्या ओक्साना लिवाचशी होणार आहे.

तर दुसरीकडे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपट्टू नीरज चोप्राने (Neeraj chopra) आज सर्वोत्तम कामगिरी केलीयं. ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष भालाफेक स्पर्धेच्या पात्रता फेरीत जबरदस्त भाला फेकून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय.

मोठी बातमी! लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल

पात्रता स्पर्धेत ब गटात आघाडीत असलेल्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भाला फेकलायं. त्यामुळे पुरुष भालाफेक स्पर्धेत भारताचा गोल्डन बॉय नीरज फेरीत दाखल झाला आहे. आता अंतिम फेरीत नीरज सुवर्णपदकाला गवसणी घालण्याची शक्यता आहे.

follow us