Virat Kohli and Rohit Sharma’s grade A+ contract will continue even after Retirement Says Bcci : भारतीय क्रिकेट संघाचा ‘हीट मॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ‘अँग्री यंग मॅन’ विराट कोहलीच्या (Virat Kohli) निवृत्तीनंतर BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. रोहित आणि विराट या दोघांनीही टी-२० आणि कसोटी सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही या दोन्ही खेळाडूंचा ग्रेड ए+ करार कायम राहणार आहे. रोहित आणि विराट अजूनही भारतीय क्रिकेटचा भाग आहेत, त्यामुळे त्यांना ग्रेड ए+ च्या सर्व सुविधा मिळतील असेही बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी एएनआय या वृत्तसंंस्थेला सांगितले आहे.
Virat Kohli and Rohit Sharma's grade A+ contract will continue even after both announced retirement from T- 20 and Test Matches. They are still part of Indian cricket, they will get all facilities of Grade A+: Secretary BCCI, Devajit Saikia to ANI
— ANI (@ANI) May 14, 2025
भावनिक पोस्ट करत विराटनं जाहीर केली निवृती
12 मे 2025 रोजी विराट कोहलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्टावर एक भावनिक पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती होत असल्याचे जाहीर केले. या पोस्टमध्ये विराटने लिहिले होते की, ‘मी १४ वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅगी ब्लू जर्सी घातली होती. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला अशा प्रवासात घेऊन जाईल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती. त्याने माझी परीक्षा घेतली, मला परिभाषित केले आणि मला असे धडे शिकवले जे मी आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाईन. पांढऱ्या जर्सीमध्ये खेळणे हा माझ्यासाठी खूप खास आणि वैयक्तिक अनुभव आहे. कठोर परिश्रम, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही, पण ते कायमचे तुमच्यासोबत राहतात.
कसोटीमधून निवृत्ती आता भारतासाठी कधी खेळणार रोहित – कोहली, जाणून घ्या टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक
दूर जातोय हे सोपं नाहीये
मी या फॉरमॅटपासून दूर जातोय ते सोपं नाहीये, पण सध्या ते योग्य वाटत असल्याचे विराटनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय. मी माझे सर्वस्व दिले आणि मला अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले. मी खेळाबद्दल, मैदानावरील लोकांबद्दल आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आभारी आहे. मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहेन असे म्हणत विराटने #269, साइनिंग ऑफ अशा शब्दांच विराटनं त्याच्या निवृतीच्या पोस्टचा शेवट केला होता.
दोन महिन्यांआधीच रोहित घेणार होता निवृत्ती; नव्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द
विराट कोहलीने जून 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध पहिला सामना खेळला होता. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण 123 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 210 डावांमध्ये विराट कोहलीने 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. यामध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा एक यशस्वी कर्णधार होता आणि त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपलनंतर कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात दुहेरी शतके करणारा विराट कोहली एकमेव दुसरा क्रिकेटपटू आहे.