IND vs ENG : आजपासुन भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर (Birmingham Test) झाली आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून (IND vs ENG) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे भारताने या सामन्यासाठी संघात तीन मोठे बदल केले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतासाठी शानदार कामगिरी करणारा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला देखील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आलेला नाही.त्यामुळे सोशल मीडियावर भारतीय संघाच्या मॅनेजमेंटवर टीका होत आहे. मात्र या सामन्यासाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) स्थान का देण्यात आले नाही याचा खुलासा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) टॉसच्या वेळी केला.
वर्कलोड मॅनेजमेंट
वर्कलोड मॅनेजमेंटमुळे जसप्रीत बुमराहला दुसऱ्या सामन्यामधून विश्रांती देण्यात आली असल्याचा खुलासा कर्णधार शुभमनने केला आहे. दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराहच्या जागी आकाशदीपला संघात स्थान देण्यात आले आहे तर सार्दुल ठाकूरच्या जागी अष्टपैलू नितीश कुमार आणि साई सुदर्शनच्या जागी संघात वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली असल्याची देखील माहिती कर्णधार शुभमन गिलने टॉस दरम्यान केली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पाच विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना खुप महत्वाचा मानला जात आहे.
🚨 Toss and Team Update 🚨
England win the toss and elect to bowl in the 2nd Test in Edgbaston.
Three changes for #TeamIndia
Updates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/fGmkOLai7x
— BCCI (@BCCI) July 2, 2025
इंग्लंडच्या संघात बदल नाही
तर दुसरीकडे या सामन्यासाठी यजमान इंग्लंडच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. टॉस जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे भारताने बर्मिंगहॅममध्ये आतापर्यंत आठ कसोटी सामने खेळले असून त्यापैकी सात सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. या मैदानात भारताने शेवटचा कसोटी सामना 2022 मध्ये खेळला होता. या सामन्यात भारताला सात विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता.
दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण, निवड कशी होते? जाणून द्या सर्वकाही
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा