AUS vs SA : वर्ल्डकपच्या (World Cup 2023) दुसऱ्या रोमहर्षक सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. येत्या रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत (India) व ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्डकप जिंकण्यासाठी भिडणार आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातीला दाणादाण उडाली. परंतु डेव्हिड मिलरच्या झुंजार शतकीय खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने सात गड्यांच्या मोबदल्यात 48 व्या षटकात गाठले.
श्रीराम तोंडी लावायला आणि बसायचं कॉंग्रेसच्या पंगतीला; चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका
कोलकात्यातील इडन गार्डनवर दुसऱ्या सेमीफायनलची अटीतटीची लढत झाली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाला पहिला झटका 60 धावसंख्येवर बसला. स्फोटक सुरुवात करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचा एडन मार्करमने त्रिफळा उडवत तंबूत परतविले. वॉर्नरने 18 चेंडूत 29 धावा केल्या. त्यात त्याने एक चौकार आणि चार षटकार मारले. त्यानंतर फलंदाजीला आलेला मिचेल मार्श खातेही न उघडताच तंबूत परतला. 61 धावांवर ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज तंबूत परतले. ट्रेव्हिस हेडने 62 धावांची खेळी केली. हेड बाद झाल्यानंतर सामना हा रंगतदार होत गेला. मार्नस लाबुशेनच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला चौथा झटका बसला.
जायकवाडीला नगरमधून पाणी नाहीच; डीपीडीसीच्या बैठकीत ठराव, सर्वपक्षीय नेत्यांचा एकच सूर
मागील सामन्यात तुफानी फटकेबाजी करणार ग्लेन मॅक्सवेलला तब्रीज शम्सीने अवघ्या एका धावेवर बाद केले. ऑस्ट्रेलियाचा अर्धासंघ 137 धावांवर तंबूत परतला होता. स्टीव्ह स्मिथ आणि जोश इग्निश बाद झाला. 193 धावांवर ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज बाद झाले होते. त्यामुळे सामना रंगदार स्थितीत आला होता. पण मिचेश स्टार्क आणि पॅट कमिन्सने आफ्रिकेच्या गोलंदाजांना सहज खेळून काढत सामना जिंकून दिला आहे.
टॉप ऑर्डरने केला घात
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. टॉप ऑर्डरमधील चारही फलंदाज संघाच्या 24 धावांवर तंबूत परतले होते. परंतु त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर डेव्हिड मिलरने झुंजार खेळी केली. त्याने शानदार शतकही झळकविले. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या आहेत. जोश हेजलवुड आणि ट्रेविड हेड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.