World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेचा थरार आता अंतिम (World Cup 2023) टप्प्यात पोहोचला आहे. पहिल्या टप्प्यातील सामने संपत आले असून आता सेमी फायनल फेरीला सुरुवात होणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघांनी सेमी फायनलचे तिकीट पक्के केले आहे. आता फक्त चौथ्या जागेसाठी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि न्यूझीलँड यांच्यात स्पर्धा आहे. आज न्यूझीलंडचा (New Zeland) सामना श्रीलंकेसोबत होणार आहे. मात्र, करो या मरो सामन्यापू्र्वी न्यूझीलंडचा सेमीफायनलचा मार्ग कठीण झाला आहे. याचा फायदा पाकिस्तानला होण्याची शक्यता आहे.
तसे पाहिले तर सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी न्यूझीलंड संघाला आहे. कारण पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानपेक्षा त्यांचा रनरेट चांगला आहे. न्यूझीलंडचे आठ गुण आहेत. पाकिस्तानचेही आठ गुण आहेत. त्यामुळे आजचा सामना न्यूझीलंडसाठी अत्यंत महत्वाचा असाच आहे. या सामन्यात जर न्यूझीलंडचा पराभव झाला तर सगळे गणित रनरेटवर अवलंबून राहिल. याचा फायदा पाकिस्तानला होण्याची शक्यता आहे. कारण, पाकिस्तानचा आणखी एक सामना बाकी आहे. या सामन्यात रनरेट सुधारण्याची संधी पाकिस्तानला राहिल.
World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच बांग्लादेशकडून लंकेची शिकार ! तीन विकेट्सने केला पराभव
आजचा सामना बंगळुरूत होणार आहे. या सामन्यात पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. कारण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने दक्षिण भारतातील राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी बंगळुरू शहरात पाऊस होईल असा अंदाजही हवामान खात्याने दिला आहे. जर पाऊस झाला तर हा सामना रद्द करावा लागेल. असे घडले तर न्यूझीलंडला फक्त एकच गुण मिळेल त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे आज न्यूझीलंड संघाला जिंकण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतीलच त्याबरोबरच पाऊस होऊ नये असेही त्यांना वाटत असेल.
पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचणार का ?
चौथ्या क्रमांकासाठी न्यूझीलँड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा एक सामना शिल्लक आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी 8 गुण आहेत. तर अफगाणिस्तानचे दोन सामने शिल्लक आहेत. या संघाचेही 8 गुण आहेत. न्यूझीलंडचा पुढील सामना श्रीलंकेबरोबर आहे. हा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न राहिल. दुसरीकडे पाकिस्तानचा सामना इंग्लंडबरोबर होणार आहे. या सामन्यात आता इंग्लंडला गमावण्यासारखं काहीच नाही. मात्र, पाकिस्तानसाठी हा सामनाही महत्वाचाच आहे. न्यूझीलंड पेक्षा चांगला रनरेट करायचा असेल तर पाकिस्तानला हा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याची गरज राहणार आहे.
World Cup 2023 : भारताचा सलग आठवा ‘विराट’विजय, दक्षिण आफ्रिकेचा 83 धावांत खुर्दा !