Download App

World Cup 2023 : टीम इंडियाला जोरदार टक्कर! ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य संघ जाहीर

World Cup 2023 : ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी (World Cup 2023) क्रिकेट संघांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियानेही या स्पर्धेसाठी आपल्या 15 सदस्यांच्या संघाची घोषणा केली आहे. अॅरोन हार्डी, नॅथन एलिस, तन्वीर संघा या खेळाडूंना संधी मिळाली नाही.

या स्पर्धेत पॅ ट कमिन्स हाच संघाचे नेतृत्व (World Cup 2023) करणार आहे. या संघात जोश हेझलवूड आण मिचेल स्टार्क या वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. शॉन अॅबॉट आणि अॅडम झाम्पा या फिरकी गोलंदाजांवर संघ व्यवस्थापनाने विश्वास दाखवला आहे.

रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानचा 2 धावांनी पराभव, श्रीलंका सुपर-4 मध्ये दाखल

फलंदाजांचा विचार केला (World Cup 2023) तर डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड या दमदार फलंदाजावर भिस्त राहिल. मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, कॅमरॉन ग्रीन हे अष्टपैलू खेळाडूही संघात आहेत. अॅलेक्स कॅरी , जोश इंग्लिस हे दोन खेळाडू यष्टिरक्षक म्हणून असतील. प्रत्यक्ष मैदानातील संघात या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. 2019 च्या विश्वचषकातील कामगिरी पाहता कॅरीचे पारडे जड दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. त्यानंतर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघ भारतात दाखल होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, अॅश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

टीम इंडियाचीही झाली घोषणा

दरम्यान, याआधी काल भारतीय संघाची (World Cup 2023) घोषणा करण्यात आली. यामध्ये संजू सॅमसन, प्रसिद्ध कृष्णा, टिळक वर्मा यांना जाहीर करण्यात आलेल्या वर्ल्डकप संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. या तीन खेळाडूंशिवाय युजवेंद्र चहललाही एकदिवसीय विश्वचषक संघातून वगळण्यात आले. भारत यजमान असणाऱ्या विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून, 19 नोव्हेंबररोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

एकदिवसीय विश्वचषकासाठी (World Cup 2023) ऑस्ट्रेलियासह अन्य प्रमुख संघांनी यापूर्वीच 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्यानंतर सर्वांच्या नजरा विश्वचषकाचे यजमानपद असणाऱ्या भारतीय संघाच्या निवडीकडे लागल्या होत्या. अखेर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) खेळणार आहे.

Tags

follow us