रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानचा 2 धावांनी पराभव, श्रीलंका सुपर-4 मध्ये दाखल

रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानचा 2 धावांनी पराभव, श्रीलंका सुपर-4 मध्ये दाखल

Asia Cup 2023: रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 2 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या विजयानंतर दशून शनाकाचा संघ सुपर-4 फेरीत पोहोचला आहे. तर अफगाणिस्तान संघाचे सुपर-4 फेरीत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. अफगाणिस्तानला सामना जिंकण्यासाठी 292 धावा करायच्या होत्या, मात्र अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 37.4 षटकात 289 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे श्रीलंकेने रोमहर्षक विजयाची नोंद केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत 8 गडी गमावून 291 धावा केल्या. अशाप्रकारे अफगाणिस्तान संघासमोर विजयासाठी 292 धावांचे लक्ष्य होते. पण अफगाणिस्तान संघाला सुपर-4 फेरी गाठण्यासाठी 37.1 षटकात किंवा त्यापूर्वी लक्ष्य गाठायचे होते. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने 32 चेंडूत 65 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याचवेळी अफगाणचा कर्णधार हशमुतल्लाह शाहिदीने 66 चेंडूत 59 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला.

अश्विन आणि चहलला का ठरला कुलदीप यादव भारी? ‘हा’ चायनामन गोलंदाजाचा इतिहास

श्रीलंकेकडून कसून राजिताने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर ड्युनिथ वेलेगेले आणि धनंजय डी सिल्वा यांना 2-2 असे यश मिळाले. महिष तिक्ष्णा आणि महिथा पाथिराना यांनी 1-1 विकेट आपल्या नावावर केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेने 50 षटकांत 8 गडी गमावून 291 धावा केल्या. अशाप्रकारे अफगाणिस्तानसमोर सामना जिंकण्यासाठी 292 धावांचे लक्ष्य होते. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक धावा केल्या. कुसल मेंडिसने 84 चेंडूत 92 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार मारले.

भारताच्या वर्ल्डकप संघात दोन सर्वात मोठ्या कमजोरी, ‘या’ त्रुटींवर अनेकांनी बोट ठेवले

तर चारिथ अस्लंकाने 43 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानसाठी गुलबदीन नायबने 10 षटकात 60 धावा देत 4 विकेट घेतल्या . याशिवाय राशिद खानने 2 बळी घेतले. तर मुजीब उर रहमानने 1 विकेट आपल्या नावावर केल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube